Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

रस्ता सुरक्षा, वाहतुकीसंदर्भात तामलवाडी येथील सरस्वती महाविद्यालयात पथनाट्याद्वारे, जनजागृती

काटी/उमाजी  गायकवाड
रस्ता सुरक्षा, वाहतुकीसंदर्भात महामार्ग पोलिसांच्या वतीने अप्पर महासंचालक, मुंबई सुखविंदर सिंग, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीमती जमादार, पोलीस उपअधीक्षक डिसले, पोलीस निरीक्षक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दि. 6 रोजी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सरस्वती माध्यमिक  व उच्च माध्यमिक विद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत रस्ता सुरक्षा, वाहतूक नियमांसंदर्भात जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात आला. या वेळी सोलापूर येथील दयानंद महाविद्यालयातील आशुतोष नाटकर यांनी रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे पथनाट्याद्वारे सादरीकरण केले.
 
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर अपघात नित्याचेच झाले आहेत. समांतर रस्ते नसणे, महामार्ग ओलांडणे,साइडपट्ट्या नादुरुस्त, खड्डे, दुभाजक नसणे, रस्ते सुरक्षा नियमांचे पालन न करणे,या कारणामुळे अपघात हाेत असतात. यासंदर्भात महामार्ग पोलीसांच्या वतीने तामलवाडीत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.

आशुतोष नाटकर यांच्या नेतृत्वातील पथकाने हेल्मेटची आवश्यकता, रहदारी नियम, चालक परवाना, वेग मर्यादा, वाहनांची कागदपत्रे, दारु न पिता वाहन चालवणे, दंडात्मक कारवाई, वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर न करणे, वाहनांच्या मागे रिफ्लेक्टर लावणे, सीटबेल्ट लावणे यांच्या बद्दलची जागरूकता यावर प्रबोधनपर पथनाट्य सादर केले. 

यावेळी वाहतूक शाखेचे नळदुर्ग  महामार्गावरील पोलिस निरीक्षक वाघमोडे, इन्सिडेंट ॲक्शिडंट इन्चार्ज गवळी, महामार्गावरील पोलीस स्टॉप, ॲम्ब्युलन्स टीम, पेट्रोलिंग टीमसह सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य सुहास वडणे, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments