Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

येणेगुर येथे श्री खंडोबारायाचे महाअभिषेक व वाघ्या मुरळी जागरण गोंधळ सोहळा संपन्न

येणेगुर/योगेश पांचाळ
उमरगा तालुक्यातील येणेगुर  येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्री खंडोबारायाचे महाअभिषेक व वाघ्या मुरळी जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सोमवार दि. 5 रोजी  सकाळी 6 वाजता खंडोबारायाच्या मुर्तीला अभिषेक करण्यात  आला. त्यानंतर दुपारी 12 वाजता येथील जय हनुमान महिला भजनी मंडळ व विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाच्या  वतीने विठ्ठल नामाचा गजरात  भजन गायनाचा कार्यक्रम करीत खंडोबाची आरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

संध्याकाळी 9 वाजता धार्मिक  वातावरणात वाघ्या मुरळीचा  कार्यक्रम  संपन्न  झाला. अविप्रकाश डिजिटल वाघ्या मुरळी पार्टी गावडी दारफळ येथील वाघ्या मुरळीचा येणेगुर खंडोबा वारू कमिटीकडून सत्कार करण्यात आला. या जागरणात खंडोबाचा पूजा विधी, गण, देव-देवतांचे आवाहन आणि वाघ्या मुरळीने खंडोबाची महात्मेपर  गाणी आणि उलट रंगात खंडोबाची संसार कथा आणि आरती असे स्वरूपात जागरण  केले. वाघ्या-मुरळी त्यांच्या गीतातून खंडोबाच्या संसाराची कहाणी, खंडोबाचे रूप-गुण वर्णन, त्याच्यातील प्रणयी भाव आणि वृत्ती, बनाईविषयी त्याला असलेली प्रीती, म्हाळसा-बाणाई याच्यातील कलह, दोन बायकांचा दादला म्हणुन खंडोबाची स्थिती, खंडोबाचा लग्न सोहळा, त्याचा थाट-माट, त्याचा पराक्रम, जेजुरी वर्णन सुरेख पद्धतीने करीत भाविकांना मंत्रमुग्ध केले.

वाघ्या मुरळीने आपल्या गीतातून वास्तव जीवन पध्दतीचे दर्शन घडवून आपले वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच वाघ्या-मुरळीकडून जागरण-गोंधळातून खंडेराया, म्हाळसा, बाणाई या आपल्यापैकीच आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. दोन बायकांच्या दादल्याची फजिती, सवती-सावतीतील कलह आणि स्री-पुरुषातील प्रणयभाव यांचे हुबेहूब चित्रण वाघ्या-मुरळीने आपल्या  सुरेल गीतातून व्यक्त केले. यावेळी श्री वारु कमिटीसह  भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला.

या कार्यक्रमासाठी येणेगुर नगरीतील महिला, पुरुष, भाविक, भक्तांसह शंकर हुळमजगे,धनराज हुळमजगे, मल्लिकार्जुन तोरमोडे,भास्कर पांचाळ,शंकर कलशेट्टी, परमेश्वर हुळमजगे,जगनाथ हुळमजगे,बसवराज बोडके,सिद्धेश्वर हिप्परगे आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments