Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटीची कन्या सौ शामल हंगरकर शिंदे-हंगरकर यांना कै.खाशाबा जाधव गुणगौरव पुरस्कार प्रदान

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटीची कन्या व सावरगावच्या  सुनबाई  सौ.शामल माणिकराव शिंदे-हंगरकर यांना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुणे जिल्हा क्रीडा संकुल व स्मिता वाल्हेकर स्पोर्टस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने कै.खाशाबा जाधव गुणगौरव पुरस्कार प्रदान  करण्यात आला.

हा  पुरस्कार शनिवार दि.4 रोजी वाल्हेकरवाडी, चिंचवड पुणे येथील माजी राज्यमंत्री रमेश बागवे,बिगबाॅस फेम अभिजित बिचकुले या मान्यवरांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा अनन्या भरत वाल्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहर अध्यक्ष डाॅ.कैलास भाऊ कदम,पुणे जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे,पिंपरी चिंचवड काँग्रेस वरीष्ठ उपाध्यक्ष भरत शंकरराव वाल्हेकर यांनी आयोजित केला होता.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments