तुळजापूर/प्रदीप अमृतराव
भुमी अभिलेखच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत तुळजापूरच्या संजय नागरेनी लाॅन टेनिस एकेरी आणि दुहेरीत अजिंक्यपद पटकावत दोन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. संजय नागरे यांनी छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रतिनिधीत्व केले. दोन सुवर्ण पदकांची कमाई केल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे.
चेंबूर जिमखाना मुंबई येथे २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान भुमी अभिलेखच्या राज्यस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२४ पार पडल्या. या स्पर्धेत भूमी अभिलेखच्या राज्यातील ०७ विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.
छत्रपती संभाजीनगर विभागातून खेळताना संजय नागरे यांनी लाॅन टेनिस एकेरीत अंतिम फेरीत नागपूर विभागातील खेळाडूवर मात करीत सुवर्णपदक पटकावले. याशिवाय लाॅन टेनिस छत्रपती संभाजीनगर च्या तन्मय महामीनेच्या साथीने दुहेरीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. दुहेरीच्या अंतिम फेरीत नाशिक विभागाच्या खेळाडूवर मात केली.
संजय नागरेच्या या दुहेरी यशाबद्दल भुमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर प्रदेश उपसंचालक किशोर जाधव, तुळजापूरचे उपअधिक्षक राजेंद्र मलाव आदींनी अभिनंदन केले आहे.
संजय नागरे उत्कृष्ठ प्रशिक्षक
संजय नागरे यांचा मार्गदर्शनाखाली शहरातील शेकडो विद्यार्थी टेनिस प्रशिक्षण घेत असून यातील अनेकांनी राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर चमकदार कामगीरी करत पदकाला गवसनी घातली आहे. नागरे यांचा या यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर
9923005236
0 Comments