Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील हर्षवर्धन माळी यांना "आदर्श शिक्षक" पुरस्कार प्रदान

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी केंद्रातून येथील रहिवासी तथा पांगरदरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले सहशिक्षक हर्षवर्धन पांडुरंग माळी यांना तुळजापूर पंचायत अंतर्गत गटशिक्षण कार्यालयाच्या वतीने देण्यात येणारा "आदर्श शिक्षक पुरस्कार" आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

विद्यादानाचे काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान व्हावा, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त तुळजापूर पंचायत समिती अंतर्गत  गटशिक्षण कार्यालयाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना पुरस्काराने गौरवण्यात येते.

यंदा काटी केंद्रातून दहिवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक हर्षवर्धन पांडुरंग माळी  यांना पंचायत समिती सभागृहात आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, गटशिक्षणाधिकारी मेहरुन्नीसा  इनामदार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत "आदर्श शिक्षक " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सहशिक्षक हर्षवर्धन माळी यांना "आदर्श शिक्षक" पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, जिल्हा शिक्षक सोसायटीचे व्हाईस चेअरमन अनिल हंगरकर,  तुळजापूर शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन दयानंद जवळगावकर, दहिवडी ग्रामपंचायतच्या सरपंच रुपाली प्रशांत गाटे,दहिवडी येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिरसट, उपाध्यक्षा सौ.वर्षा भोसले, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्यासह पांगरदरवाडी येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ शिंदे,माजी अध्यक्ष शंकर कदम, पांगरदरवाडीचे माजी सरपंच विजय निंबाळकर, बालाजी शिंदे,गणेश गायकवाड, पंकज भापकर, सहशिक्षक बापू काळे, सोमा जामगावकर, पंकज काटकर यांनी अभिनंदन  करुन शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments