काटी/उमाजी गायकवाड
शासन सगसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करत नसल्याने आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काटी गावातून लोकसभा निवडणुकीत दोन उमेदवार देण्यासाठी शुक्रवार दि. 22 रोजी सायंकाळी 8 वाजता येथील तुळजापूर तालुक्यातील काटी येथील मुख्य बाजार चौकात घेण्यात आलेल्या काटीसह सावरगाव, केमवाडी,दहिवडी,पांगरदरवाडी, सुरतगाव, गंजेवाडी,वडगाव (काटी) येथील सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
प्रत्येक गावातून मराठा समाजाचे दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सकल मराठा समाजाने घेतला आहे . गावातील मुख्य बाजार चौकात घेण्यात आलेल्या सकल मराठा बांधवांच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.या बैठकीत मुस्लिम मावळा विद्यमान उपसरपंच जुबेर शेख यांनी मराठा आरक्षणासाठी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याचे सांगितले.
या बैठकीत राजकीय नेत्यांना गाव बंदीसह राज्य शासनाने 26 जानेवारी रोजी काढलेल्या सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीला पाठिंबा म्हणुन मराठा समाजाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन मराठा उमेदवार उभे करणे, महाराष्ट्रात मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत असे विविध ठराव एकमताने संमत करण्यात आले.
तसेच लोकसभेसाठी उमेदवार उभे करताना अनामत रक्कम व इतर खर्च करण्यासाठी गावागावातून वर्गणी गोळा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याशिवाय राज्यातील सर्वच जागांवर उमेदवार उभे राहणार असले तरी काटी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात मराठा समाजातील उमेदवार उभे करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. सगेसोयरे अधिसुचनेची अंमलबजावणी होईपर्यंत मराठा समाजातील बांधवांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवत केवळ समाजाचा व्यक्ती म्हणून उभे राहावे अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
त्यासाठी राजकीय नेत्यांना गावात व घरी येण्यास बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विषयाच्या अंमलबजावणीसाठी मराठा समाजाने कामाला लागण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी उपस्थित मराठा समाजाला मार्गदर्शन करताना माजी नगरसेवक तथा पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके म्हणाले की,मराठा समाजासाठी आंदोलन उभे करणारे सर्वसामान्य कुटुंबातील संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचे नेते मानायला तयार नसल्याचे सांगून आपल्या प्रामाणिकपणे चालवलेल्या आंदोलनामुळे विश्वासाने आपल्या मागे उभे राहिलेल्या लाखो मराठा लोकांना शांततेत,अहिंसक आंदोलन करण्याची प्रेरणा देत आहेत. मनोज जरांगे पाटील हा कुणी तत्त्ववेत्ता नाही, प्राध्यापक नाही की राजकीय नेताही नाही. हा एक प्रामाणिक,निस्पृह, बारावीपर्यंत शिकलेला साधा माणूस आहे.आज त्यांच्या एका हाकेवर राज्यातील अवघा मराठा समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहिला आहे. प्रामाणिकपणा, अहिंसा आणि शांततेत किती ताकद असते हे एका सर्वसामान्य कुटुंबातील जरांगे पाटील यांनी गेल्या पाच-सहा महिन्यांत अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिले असून मराठा आरक्षण आंदोलनाचा ते चेहरा बनले आहेत. प्रचंड शक्तीशाली असणाऱ्या सरकार नावाच्या यंत्रणेला शिडशिडीत बांध्याच्या जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सळो की पळे करून सोडलं असल्याचे सांगितले. तसेच येथे उपस्थित राहिलेल्या मराठा बांधवांचे कौतुक करीत मराठा समाज सध्या दारिद्र्य अवस्थेत जगत असून त्याला कुठल्याही शासकीय सुविधा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. प्रत्येक समाजाच्या नेत्यांनी आप-आपल्या समाजाचे हित पाहिले. परंतु आपल्या समाजातील मात्तबर समजल्या जाणाऱ्या धनदांडग्या नेत्यांनी मात्र स्वतःच्या हिता व्यतिरिक्त आपल्या समाजाचे हित पाहिले नसल्याची शोकांतिकाही त्यांनी यावेळी
व्यक्त केली. आज राजकीय क्षेत्रातील लोकांना पैसे देऊन सभेसाठी लोकांना बोलावले जाते. परंतु संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी एक रुपया ही न देता गरजवंत मराठा बांधव लाखोंच्या संख्येने गोळा होतात. हि त्यांच्या प्रामाणिकपणाची किमया असल्याचे सांगितले. यापुढे धनदांडग्या मराठ्यांच्या आमिषाला बळी न पडता गरजवंत मराठ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याची भावना व्यक्त करीत यापुढे मराठा समाजाला धनदांडग्या मराठ्यातील कोणी वेठीस धरत असेल गरजवंत मराठा कोणाला घाबरणारे नसल्याचे सांगून तशी दमदाटी कोणी करत असेल तर हा सज्जन साळुंके व आमचे सहकारी मराठा बांधव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिले.
तसेच येत्या रविवार दि.24 मार्च रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या "संवाद" बैठकीस तालुक्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही सज्जनराव साळुंके यांनी यावेळी केले. यावेळी स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, स्वराज्य पक्षाचे मराठवाडा प्रवक्ते जीवनराजे इंगळे, सरपंच सुजित हंगरगेकर, उपसरपंच जुबेर शेख यांनीही मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
या बैठकीस माजी नगरसेवक तथा पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय (भैय्या)साळुंके, स्वराज्य पक्षाचे मराठवाडा प्रवक्ते जीवन राजे इंगळे, तेजस बोबडे, प्रशांत सोंजे,कुमार टोले, सत्यजित साठे,प्रसाद मुळे, प्रशांत इंगळे, औदुंबर जमदाडे, दादा साळुंके, गंगाराम शिंदे, बालाजी जाधव, शंतनु वाघ, जगदाळे, सरपंच सुजित हंगरगेकर, उपसरपंच जुबेर शेख, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,प्रदीप साळुंके,अनिल गुंड, प्रकाश गाटे आदींसह काटी सावरगाव,केमवाडी, दहिवडी, पांगरदरवाडी सुरतगाव,गंजेवाडी, वडगाव (काटी) या काटी जिल्हा परिषद गटातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments