काटी/उमाजी गायकवाड
आदरणीय धनंजय (भैय्या)रणदिवे साहेब आज रविवार दि. 24 मार्च रोजी तुमचा वाढदिवस तुम्हाला तुळजापूर तालुक्यातील काटी येथील पत्रकार उमाजी गायकवाड परिवाराकडून व ग्रामीण पत्रकारांच्या वतीने अत्यंत मनःपूर्वक शुभेच्छा!!
दैनिक पुण्यनगरीचे वृत्तसंपादक तथा जिल्हा मराठी पत्र संघाचे अध्यक्ष मा.श्री. धनंजय (भैय्या) रणदिवे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा हा थोडक्यात वृत्तांत...
दैनिक पुण्यनगरी वृत्त संपादक तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण करत असलेल्या पत्रकारितेमधील आपल्या धारदार लेखणीच्या माध्यमातून तुमची कर्तबदारी तुम्हाला यश मिळवून देईल असा विश्वास आम्हा ग्रामीण पत्रकारांना निश्चितपणे आहे. वाढदिवस हे एक निमित्त आहे या दिवशी शुभेच्छा वर्षाव होतोच, परंतु आमच्या शुभेच्छा वर्षभरासाठी आहेत तुम्ही आम्हा शहरी पत्रकारांसह ग्रामीण पत्रकारांचे मार्गदर्शक आहात. पत्रकार दिन पत्रकारितेमधील आपली लेखणी,आपल्या कामाची लकब पाहून आम्ही सर्व ग्रामीण पत्रकार भारावलो आहोत. याची कारणे अतिशय वेगळी आहेत अगदी मोकळेपणाने सांगतो समाजाच्या आणि पत्रकारांच्या प्रश्नांसाठी आपण झोकून दिलेत. पत्रकारितेमधील काम करण्याची तुमची धमक हे तुमचे विलक्षण सामर्थ्य आहे. तुमची मेहनत आणि जिद्द यामुळे आम्हा ग्रामीण पत्रकारांना आपोआपच उर्जा मिळते. धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण शहरी आणि ग्रामीण पत्रकारांचे उत्कृष्टपणे नेतृत्व करीत आहात. पत्रकारितेच्या माध्यमातून मोठी शक्ती तुम्ही आम्हाला देत आहात पत्रकारांचे विविध प्रश्न सोडण्यासाठी तुमची तळमळ तुमच्या प्रत्येक दिवशी आम्हाला जाणवते आहे. प्रत्येक विषयात आपले पत्रकार बांधव कसे उभे राहतील त्यांना सुविधा कशा निर्माण होतील याचा विचार तुम्ही करता आणि हेच तुमचे मोठेपण म्हणून आम्हा ग्रामीण पत्रकारांना भावले आहे.
आज समाजात स्वतः खेरीज दुसऱ्यांचा विचार करणारी माणसे फार कमी आहेत. स्पष्ट बोलणारी आणि निर्भीडपणे मत मांडणारे तुमच्यासारखी माणसे ही समाजाची गरज आहे. कोणाला आवडो अथवा न आवडो तुमच्या स्वभावाचे स्पष्टोक्ततेपणा हे खास वैशिष्ट्य असून कोणतेही काम हाती घेतले कि बघतो,पाहून घेतो हे शब्द तुमच्या कोषात बसत नाहीत हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. आपली निर्भिड पत्रकारिता आम्हा ग्रामीण पत्रकारांसाठी आदर्शवत आहे. तसेच ग्रामीण पत्रकारांचे बहुतांश प्रश्न शहरातील पत्रकारांपेक्षा भिन्न आहेत हे समजून घेत ग्रामीण पत्रकार नेमक्या कोणत्या परिस्थितीत काम करीत आहेत ? त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते ? एकुणच ग्रामीण पत्रकारांना स्थानिक पातळीवर काम करीत असताना त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे निश्चितपणे जाणून असल्यामुळे आपण नेहमी आम्हा ग्रामीण पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात.
विकासापासून कोसो दूर असलेल्या कष्टकरी, शेतकरी, शेतमुजरांसह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून लढा उभारणारे दैनिक पुण्यनगरीचे वृत्तसंपादक तथा धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक धनंजय(भैय्या) रणदिवे शहरी पत्रकारांसह ग्रामीण पत्रकारांचे देखील आधारवड मानले जातात. त्यांनी ग्रामीण पत्रकारांना वेळोवळी मार्गदर्शन करून प्रसंगी मदत देखील केली आहे. सातत्याने समाजातील तळागाळातील लोकांच्या प्रश्नांसाठी झटणारे लोकसंग्राहक पत्रकार म्हणजे धनंजय (भैय्या) रणदिवे यांची ओळख आहे. राज्यातील सर्वात अविकसित व मागासलेला भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व सतत अवर्षण,अतिवृष्टी,दुष्काळ अशा विविध संकटाशी सामना करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील सारोळा या गावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात धनंजय (भैय्या) यांचा जन्म झाला. प्रतिकुल स्थितीवर मात्र करीत त्यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये एक नवा मापदंड निर्माण केला आहे. गत 23 वर्षातील त्यांचा पत्रकारितेचा प्रवास आजच्या तरुण पिढीला विस्मयचकित करणारा असून नव्याने पत्रकारिता क्षेत्रात आलेल्या लोकांसाठी दिपस्तंभ ठरणारा आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारितेचा कुठलाही अनुभव नसताना किंवा घरच्या कोणाचाही पत्रकारिता क्षेत्राशी दुरान्वयानेही संबंध नसताना त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात धारदार लेखणीतून धाराशिव जिल्ह्यात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.सतत हसतमुख चेहरा, जबरदस्त स्मरणशक्ती, सिद्धहस्त लेखक,हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची जिल्हाभरात ओळख आहे.त्यांनी दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्राच्या माध्यमातून सडेतोड, वास्तव व निर्भिडपणे लिखाण करुन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. सत्ता कोणाचीही असो परंतु सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कसा करुन घ्यायचा याचे सार्थ उदाहरण म्हणजे धनंजय (भैय्या) रणदिवे हे आहेत. जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी त्यांची तिसऱ्यांदा सर्वानुमते निवड झाली असून ते अध्यक्ष पदाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांनी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नावरही आवाज उठवला आहे.विशेषत: ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्न सोडविण्याकडे देखील त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. धाराशिव जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नाविषयी त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच पुढाकार घेतला आहे.
सातत्याने सकारात्मक, रचनात्मक कार्याचा आदर्श निर्माण करणारे लिखाण व सामाजिक कार्यास प्रसिद्धी देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्याचे काम त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केले आहे. त्यांनी गावोगावचे विकासाचे प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून अतिशय हातोटीने मांडले आहेत. कै.श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठान, धनंजयभैय्या रणदिवे मित्रमंडळ, राजे छत्रपती तरुण मंडळ यांच्या माध्यमातून सतत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात. त्रेलोकीचे स्वामी श्री दत्तगुरु महाराजांचे भक्त असल्यामुळे ते आपल्या निवासस्थानी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमाने दरवर्षी साजरा करतात. त्यांना अध्यात्मिक विचारांची आवड असल्यामुळे वारकरी सांप्रदायातील नामवंत किर्तनकारांचे कीर्तन कार्यक्रमाचे देखील ते आयोजन करतात. आमचे मार्गदर्शक, सर्वसामान्य जनतेसह ग्रामीण पत्रकारांचे आधारवड धनंजय(भैय्या) यांना पत्रकारिता, अध्यात्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य करण्यासाठी उत्तम आरोग्य व सुखी, समृद्ध आयुष्य लाभो हिच त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना.
शब्दांकन
पत्रकार उमाजी गायकवाड
काटी ता.तुळजापूर
9923005236
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड,काटी
9923005236
0 Comments