Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सुप्रीम कोर्टावर आमचा पुर्ण विश्वास; शिवसेने संदर्भातील सुप्रीम कोर्टातील निकाल हा शिवसेनेसाठी नसून लोकशाही जीवंत आहे की नाही यासाठी महत्वाचा असणार आहे--शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माजी नगरसेवकासह अनेक युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

तुळजापूर/उमाजी  गायकवाड
 शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी सायंकाळी जनसंवाद यात्रा दौऱ्या दरम्यान तुळजापूर येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील असंख्य जनसमुदाय सभेसाठी लोटला होता.

तुळजापूर येथील जनसंवाद यात्रेत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की,भाजपने  आमदार,खासदार जरी पन्नास खोक्यामध्ये विकत घेतले असले तरी संपूर्ण राज्यातील जनता तुम्हाला विकत घेता येणार नाही असा उपरोधिक टोला लगावत निष्ठावंत व सच्चा शिवसैनिक काय असतो हे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी दाखवून दिल्याचे सांगून त्यांचे कौतुक करीत ही सर्वसामान्य जनता शिवसेनेच्या (उबाठा गट) पाठीमागे असल्याचे भाजप,व शिंदे  गटाला ठणकावून सांगितले. सभेतील समोरील शिवसैनिकांची गर्दी पाहून ओमराजे निंबाळकर यांचे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्याची गरज नसल्याचे सांगून आगामी लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गृहमंत्री अमित शाह यांनी युती असताना दिलेल्या वचनांची आठवण करुन देताना म्हणाले की, मातोश्रीवर येऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षे व भाजपचा अडीच वर्षे मुख्यमंत्री होईल असे वचन  गृहमंत्री अमित शाह यांनी दिले असताना आम्ही तसे वचनच दिले नाही अशी बोंब मारत असल्याचे सांगितले. परंतु मी आई तुळजाभवानीचा निश्चिम  भक्त असून मी आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो,अमित शाहांनी मला मातोश्रीवर येऊन अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचे वचन दिले होते, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत ठणकावून सांगितले. तुळजापूर येथील जनसंवाद यात्रेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बोलत होते. 

या वेळी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार संजय राऊत, आमदार कैलास पाटील, नेत्या सुषमा अंधारे, धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर,प्रतापसिंह पाटील, शिवसेनेच्या शामलताई वडणे-पवार,शाम पवार, सुधीर  कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आमचे हिंदुत्व हे भाजपच्या गोमूत्रधारी हिंदुत्वासारखे नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. ही लढाई भावी पिढीसाठी असून, उद्या आम्ही जिंकणारच, असा विश्वास व्यक्त करीत ज्यांना भाजपमध्ये जायचे असेल त्यांनी आता जावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेनेची 2018 सालची घटना मान्य करण्याची मागणी फेटाळत शिंदेंचे आमदार पात्र, खरी शिवसेना शिंदेंची असा निकाल दिला परंतु या निकालाविरोधात आम्ही  सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असून सुप्रीम कोर्टावर आमचा पुर्ण विश्वास असून निकाल आपल्या बाजूनेच लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. आम्हाला जनतेच्या न्यायालयात निश्चित न्याय मिळेल असे त्यांनी आवर्जून सांगितले. शिवसेने संदर्भातील सुप्रीम कोर्टातील निकाल हा शिवसेनेसाठी नसून लोकशाही जीवंत आहे की नाही यासाठी महत्वाचा असणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

माजी नगरसेवक राहुल खपले यांच्यासह अनेकांनी केला शिवसेनेत पक्ष प्रवेश
यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तुळजापूर विधानसभेचे तीन टर्म आमदार राहिलेले कै. भाई माणिकराव खपले  यांचे नातु माजी नगरसेवक राहुल खपले  यांच्यासह उमेश भिसे,नवनाथ जगताप,राज खपले,आनंद क्षिरसागर, अनमोल साळुंके, बापूसाहेब दळवी,राहुल पोळ, विनायक कोळी आदी कार्यकर्त्यांनी शिवसेना (उध्दव ठाकरे गट)पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचे शिवसेनेच्या वतीने पक्षात त्यांचे स्वागत केले.

शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश करताना 
माजी नगरसेवक राहुल खपले यांच्यासह उमेश भिसे, नवनाथ जगताप, राज खपले, आनंद क्षिरसागर, अनमोल साळुंके, बापुसाहेब दळवी, राहुल पोळ, विनायक कोळी आदी युवक...

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड
9923005236

Post a Comment

0 Comments