Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

येणेगूर येथील हायटेक इंग्लिश स्कूल येथे दोन दिवसांच्या वार्षिक स्नेहसंमेलनात 429 चिमुकल्यांची धमाल

येणेगूर/प्रतिनिधी
 उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील हायटेक इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनात दोन दिवसात 429 चिमुकल्याने  बहारदार नृत्य सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळवली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व नटराज प्रतिमेचे पूजन करून व कार्यक्रमाला सुरुवात केली.व (ता.6)पहिल्या दिवसाचे कार्यक्रमाचे उद्घाटक  सहाय्यक पोलीस निरीक्षक लातूर व संस्थापक अध्यक्ष लघुवंश पब्लिक स्कूल लातूर एस.आर.वाघमारे,यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे  अध्यक्ष सहाय्यक  पोलीस उपनिरीक्षक मुरूम नवनाथ गाडेकर, हायटेक इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापिका सरस्वती मोरे,कार्यक्रमाची उपस्थितीत येणेगूरचे सरपंच रेखाताई गुंजोटे, विवेक वर्धनीय सामाजिक संस्था उमरगा अध्यक्ष सुकमारबाई जकेकुरे, पत्रकार संभाजी पाटील, पत्रकार ,शरद गायकवाड, निजगुण स्वामी, योगेश पांचाळ,प्रकाश कंटेकुरे, हायटेक इंग्लिश स्कूल संस्थापक लक्ष्मण जकेकुरे,व दुसऱ्या दिवसाचे  ता.7 वार गुरुवार रोजी कार्यक्रमाचे उद्घाटक उद्योजक अनिल संगशेट्टी, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष धाराशिव विलास कंटेकुरे, कार्यक्रमाचे प्रमुखपाहुणे शिवअण्णा जकेकुरे उपस्थितीत सर्व मान्यवरांचे पुष्पहार व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. एकदताय या गणेशच्या गीताने सादरीकरण सुरुवात झाली.आमच्या पप्पांनी गणपती आणला व रामायण गीत,हळदी कुंकू नाटिका व मराठी मालिका मिक्स गाणे 8 वी च्या विद्यार्थिनी, मेरा रंग दे बसंती चोला 4थी, मकना रिमिक्स साँग,देश भक्ती साँग 2 री, काही रिमिक्स गीतावर लोकांनी ठेका धरला व एका पेक्षा एक बहारदार गीते व नाटक आशा भरगच्च कार्यक्रमाने गावकऱ्यांना  बाल कलाकारांनी  चार ते पाच तास खेळवूण ठेवले.सुंदर अशा आयोजन केल्याबद्दल शिक्षक  शिक्षकेतर कर्मचाराचे ग्रामस्थाने  वाहवा केले.या दोन दिवसच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी महेक पठाण,घोरपडे श्रेया,लुटे रक्षिता,गायकवाड श्रुती,साक्षी चौगुले,अमित रेड्डी सर यांनी केले.कार्यक्रमाचा समारोप  वंदे मातरम राष्ट्रगीताने  समारोप केला. आभार प्रदर्शन दिलीप ढोबळे मानले.राजेंद्र कुमार,कांबळे योगेश,महादेव मंगरूळे,ईरप्पा मंडळे इगवे.एस.एस,पांचाळ प्रतिभा, मंडळे राधिका,कांबळे प्रतिभा,सोलापूरे वर्षा,हिंगमिरे अल्का, सागर संध्या,कांबळे राणी,देशमुख मयुरी जामगे गौरी पाटील धनश्री, व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व बहुसंख्येने ग्रामस्थ ही उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments