तुळजापूर/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथे गुरुवार दि. 7 रोजी सायंकाळी 7 वाजता सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत दोन उमेदवार निवडणूक मैदानात उतरविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
शासनाने दिलेले एसईबीसी 10 टक्के आरक्षण मनोज जरांगे पाटील मान्य करीत नाहीत, म्हणून त्यांच्याविरोधात एसआयटी लावून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व राजकीय पक्षांविरोधात मराठा आरक्षणावरुन मराठा समाजामध्ये संताप व्यक्त आहे. सरकारने मराठा समाजाला दिले आश्वासने फसवी असून त्याची सरकारकडून कुठलीही पुर्तता केली नाही. समाजाची आजपर्यंत दिशाभूल झाल्याने सरकारला धडा शिकविण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील मोर्डा गावातून येत्या लोकसभा निवडणुकीत गावातून
किमान दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय येथील सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मोर्डा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत मराठा समाजाला यापूर्वी दोनवेळा दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नसल्याचा आरोप करीत पुन्हा तेच 50 टक्क्यांबाहेरचे आरक्षण माथी मारल्याचे बैठकीत चर्चा करण्यात आली. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी हे आरक्षण नाकारल्याने त्यांच्याविरोधात सरकारने कट रचण्यास सुरुवात केल्याने येथील मराठा समाज या बैठकीत संतप्त झाल्याचे दिसून आले.
या बैठकीत राजकीय पक्षांच्या मोर्चा, सभा, बैठकांवर बहिष्कार कोणत्याही राजकीय पक्षाची सभा असो किंवा मोर्चा, बैठकांवर मराठा समाजाने बहिष्कार घालावा अथवा निषेधाचे फलक घेऊन उभे राहावे, सुखदुःखांची परिस्थिती वगळता गावामध्ये पुढाऱ्यांना गावबंदी असेल, गावपुढाऱ्या व्यतिरिक्त कोणत्याही नेत्यांचे बॅनर लावू नये, मराठा आरक्षणावर जो पर्यंत मराठा समाजाचे समाधान होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत, राजकीय स्टेजवर मराठा समाज जाणार नाही, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी,राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण आम्हाला मान्य नाही त्यामुळे मनोज जरांगे-पाटील ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे ठराव या बैठकीत एकमताने घेण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीत दत्ता राजेंद्र सुरवसे व अमोल दिलीप जाधव या दोघांची उमेदवारी बाबत चर्चा झाली असून त्यांच्या उमेदवारीची शक्यता वर्तवली जात आहेत.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर
9923005236
0 Comments