Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

जागतिक महिला दिनानिमित्त पोलिसांकडून महिलांचा सन्मान

काटी/उमाजी  गायकवाड
यंदा 8 मार्च या दिवशी महिला दिन आणि महाशिवरात्री उत्सव हे दोन्ही एकाच दिवशी आले आहेत. हे दोन्ही कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले.

आज जागतिक महिला दिन आज महिला कोणत्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाहीत. समाजाच्या प्रगतीत पुरुषांइतकाच महिलांचाही वाटा आहे,समाज प्रगतीसाठी तसेच राजकारण,अर्थशास्र आणि सामाजिक क्षेत्रांसह जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये महिलांचे योगदान  मोठे आहे. या जागतिक महिला दिनानिमित्त त्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशाने महामार्ग प्रभारी पोलिस अधिकारी वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलिसांच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील आरोग्य उपकेंद्रात महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी महामार्ग पोलिसांसह तामलवाडी आरोग्य उपकेंद्रातील संगिता चव्हाण, आशा कार्यकर्त्या सविता रेनकुटे, उज्वला जगताप, बचत गटातील सदस्या उपस्थित होत्या.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments