काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शुक्रवार दि. 8 रोजी आनंद शिवाजी सोनवणे याने काटी, दहिवडी व सारोळा गावच्या शिवेवर असलेल्या तुळजापूर रोडवरील नागनाथ मंदीरात अतिशय कल्पकतेने व कलाकुसरीने महादेवाची आकर्षक रांगोळी साकारली असून दर्शनासाठी मंदीरात येणाऱ्या भाविकांचे या रांगोळीने लक्ष वेधून घेतले आहे.
दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला ही महाशिवरात्री साजरी केली जाते. दरवर्षी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. येथील नागनाथ मंदीर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी अभिषेक, पुजा, अर्चा करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
यंदा महाशिवरात्रीनिमित्त नागनाथ मंदिरात आनंद सोनवणे याने मंदीरात रंगीबेरंगी रांगोळीने साकारलेल्या आकर्षक महादेवाच्या रांगोळीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments