Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

‘चला करूया मैत्री गणिताशी..’ चव्हाणवाडी जि.प. प्राथमिक शाळेचा अभिनव उपक्रम; प्रथम येणाऱ्या 6 विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने इयत्ता 3 ते 8 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘चला करूया मैत्री गणिताशी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता तिसरी  ते आठवीच्या 90 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला  होता.

गणित हा विषय मनोरंजक बुद्धीला चालना देणारा असतानाही विद्यार्थ्यांना कठीण व कंटाळवाणा वाटतो, याचे कारण गणिताविषयी त्यांच्या मनात असलेली भीती. खरे तर गणित हा विषय क्रमिक व विविध स्पर्धा परीक्षांसाठी अनिवार्य असतो. मात्र, त्याच्या भीतीमुळे शालेय जीवनापासूनच अनेक  विद्यार्थी गणितापासून दोन हात दूर राहतात. विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयीची  असणारी भिती दूर व्हावी व त्यांच्यामध्ये गणिताविषयी आवड निर्माण व्हावी हे लक्षात घेऊन तुळजापूर तालुक्यातील  चव्हाणवाडी जि.प. प्राथमिक शाळेने हा अभिनव उपक्रम राबवला. शालेय जीवनातच जर विद्यार्थ्यांची गणिताविषयीची भीती दूर झाली व गणितातील क्लृप्त्या आणि सूत्रे त्यांना अवगत झाली तर भविष्यामध्ये त्यांना कोणतीही अडचण येणार नाही हे समजावून देत शाळेने या अभिनव उपक्रमासाठी एक हजार प्रश्नांची निर्मिती केली होती. यामध्ये रोज पाच प्रश्न परिपाठा दरम्यान विचारुन ते प्रश्न विद्यार्थ्यांकडून वहित  लिहून घेतले जात होते. या एक हजार प्रश्नावली मधून शाळेने तिसरी ते पाचवी आणि सहावी ते आठवी या दोन गटातून इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची सोमवार  दि.1 एप्रिल रोजी अंतिम परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतून तिसरी ते पाचवी व सहावी ते आठवी या दोन गटातून प्रत्येकी तीन यशस्वी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.

शाळेने घेतलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करुन स्थानिक प्रगतशील शेतकरी कृष्णाथ मारुती चव्हाण यांच्या मातोश्री शामलबाई मारुती चव्हाण यांच्या वतीने सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पालक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आदी
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

शाळेने विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी  आवड निर्माण व्हावी या हेतूने 'करुया मैत्री गणिताशी' या अभिनव  उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments