काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी, सावरगाव, तामलवाडी परिसरात शनिवार दि. 20 रोजी दुपारी चार वाजता वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
या अवकाळी पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील शेतकरी सुनिल सुखदेव काळे यांनी गट नंबर 211,224 व 226 यामध्ये सव्वा दोन एकरातील पपईचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पपईचे पीक अक्षरशः भुईसपाट झाले. या वादळीवाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे अन्य पिकांसह आंब्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे केमवाडी येथील शेतकरी सुनिल काळे यांच्या पपईसह सोमनाथ सातपुते, विश्वनाथ नखाते,उमेश काळे, रामचंद्र ईटूकडे,विलास काळे यांच्याही पपईचे नुकसान झाले आहे. तसेच या अवकाळी पावसाने अन्य पिकांचे व आंब्याचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात आली आहे.
वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसामुळे पपईचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास गेला. उकडा व ढगाळ वातावरण कायम असल्यामुळे पाऊस पुन्हा येईल की काय अशी भीती आहे.अस्मानी संकटामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
--बालाजी सुनिल काळे, शेतकरी केमवाडी ता. तुळजापूर
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments