Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

नृसिंह जयंती निमित्त आयोजित पंचदिनी किर्तन महोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता; व्यसनमुक्तीचा संकल्प तंबाखू, गुटखा पुड्याची केली होळी; व्यसनमुक्तीचा संकल्प करा; सुन,मुलगी,सासू ही विषमता दूर करा--हभप अनिल महाराज पाटील यांचे आवाहन

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी  येथील नृसिंह जयंती निमित्त बसस्थानक जवळील कै. विजयसिंह देशमुख शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या समोरील मैदानात माजी चेअरमन  सयाजीराव देशमुख, सरपंच सुजित हंगरगेकर, उद्योजक अमरसिंह देशमुख, प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या किर्तन महोत्सवाची हभप अनिल महाराज पाटील यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाच्या  वाटपाने अतिशय भक्तीमय वातावरणात सांगता झाली.

18 मे 22 मे या पवित्र कालखंडात किर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या किर्तन  महोत्सवात महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रबोधनात्मक  किर्तनकार हभप श्री. सागर महाराज बोराटे (आळंदी), शब्द प्रभू हभप श्री संग्राम बापू  भंडारे महाराज (आळंदी), वाणी भूषण हभप श्री ज्ञानेश्वर महाराज तांबे (नेवासा),  किर्तन केसरी हभप श्री आक्रुर महाराज साखरे (गेवराई),  भाषा प्रभू हभप श्री अनिल महाराज पाटील (बाभळगाव) यांची किर्तन सेवा या भव्य  किर्तन महोत्सवात झाली. हभप श्री अनिल  महाराज पाटील (बाभळगाव) यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने मोठ्या  भक्तीमय वातावरणात सांगता झाली. या किर्तन महोत्सवात प्रसिद्ध  गायनाचार्य संगीत विशारद श्री शंकर महाराज अनपट (आळंदी), गायनाचार्य संगीत विशारद श्री. समाधान महाराज निचळ (आळंदी), व प्रसिद्ध मृदंग सम्राट श्री कृष्णा महाराज कदम (आळंदी) यांच्या  साथीने या किर्तन महोत्सवाला चांगली रंगत आली होती.

यावेळी काल्याच्या  किर्तनात हभप श्री हभप अनिल महाराज पाटील यांनी तुकाराम महाराज यांच्या हरिपाठातील येथील जे एक घडी | तये जोडी पार नाही    ||१|| किती त्याचा सासुरवास | कैंचा रस हा तेथे ||ध्रुव|| अवघे गेले दिवस कामा | नाही जन्मा खंडन ||३|| तुका म्हणे रतल्या जणी |
सोडा जणी कान्होबा ||४||  या अभंगाने भाविक श्रोत्यांना अडीच तास टाळ-मृदंगाच्या साथीने नामस्मरणात दंग केले होते. आपल्या अभंग वाणीतून त्यांनी राज्याचे तत्कालीन ग्रहमंत्री कै.आर.आर.पाटील यांची राज्याला गरज असताना तंबाखूच्या व्यसनाने त्यांचे दुर्दैवी निधन झाल्याचा दाखला देत आजचा युवक हा उद्याचा सुजाण नागरिक होणार असल्यामुळे येणारी भावी पिढी ही व्यसनांपासून दूर असली पाहिजे. यासाठी व्यसनमुक्त समाज निर्मितीकरिता सर्वांनी संकल्प करणे गरजेचे असून  व्यसनमुक्तीचा संकल्प करणे काळाची गरज असल्याचे आवाहन हभप श्री अनिल महाराज पाटील यांनी आपल्या  किर्तनातून केले. उपस्थित महिलांना उद्देशून  सासू- सुन व मुलगी यांच्यातील विषमतेवर बोलताना ते म्हणाले की,बायको (स्त्री) ही क्षणभराची पत्नी व अनंतकालची माता असते. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ ही वचने नितांत सत्य आहेत. कुटुंबाचा केंद्रबिंदू असलेली ही स्त्री जेव्हा सूनरूपी दुसरी स्त्री घरात येते तेव्हा तिची मानसिकता कशी बदलते. अर्थात अत्यंत प्रेमाने,आदराने व्यवस्थित नाते जोपासणाऱ्या पुष्कळ स्त्रिया आहेत. मात्र “सासूबाई’ ही उपाधी लागली की सत्ता, मानपान व अपेक्षा आणि तुलना या विकारांमुळे कुटुंबात नक्की ताण येतो. याउलट सासू, सुना व मुलगी समंजस असतील तर घरात “स्वर्ग’ उतरतो. लग्नाचा सरळ अर्थ “तडजोड’ व कुटुंबातील नाती कौशल्यपूर्ण सांभाळणे. त्यामुळे सुनेने सासूला आईचा मायेने सांभाळावे तर सासुने सुनेला संयम , सामंजस्याने मुलीप्रमाणे सांभाळावे तरच कुटूंबाची वाटचाल सोपी जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच माजी राष्ट्रपती  प्रतिभाताई पाटील यांचे उदाहरण देत ‘महिला व तरुणींनी भारतीय संस्कृतीचे जतन केले पाहिजे. विज्ञानयुगात वावरत असलो तरीही महिलांनी कुटुंब सांभाळणेही तितकेच महत्त्वाचे असून आई, वडिलांची मान लाजेने खाली जाईल अशी वर्तणुक महिला व तरुणींकडून होता कामा नये.’ असे सांगताना महिलांनी संस्कृती जपण्याचा सल्ला हभप श्री अनिल  महाराज पाटील बाभळगाव यांनी आपल्या सुश्राव्य कीर्तनातून दिला.
शेवटी उपस्थिताकडील तंबाखू, गुटखा पुड्या घेऊन व्यसनमुक्तीच्या शपथेवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्याची होळी केली. 

शेवटी दहिहंडी फोडून व भाविकांना महाप्रसादाच्या वाटपाने या पंचदिनी किर्तन महोत्सवाची सांगता करण्यात आली.

हा किर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी माजी चेअरमन  सयाजीराव देशमुख, सरपंच सुजित हंगरगेकर, उद्योजक अमरसिंह देशमुख, प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे, सुहास उर्फ  पिंटू कुलकर्णी, वसंत हेडे, संजय देशमुख, सत्यजित देशमुख, उपसरपंच जुबेर शेख, अजय देशमुख,कृष्णा महाराज कदम, हभप सुनिल महाराज ढगे, गणपत चिवरे, मनोहर कदम, तात्यासाहेब भापकर, अमोल गावडे, जयाजी देशमुख, धनाजी गायकवाड, अरुण गाजरे,सुनिल परिट, नितीन पांढरे, ब्रह्मदेव माळी,शिवलिंग घाणे,भैरी काळे, सचिन  साळुंके, राहुल गायकवाड, भैय्या गाजरे, शहाजी गायकवाड,आदींसह काटी येथील भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, पांगरदरवाडी, दहिवडी, शेळगाव (आर), जवळगाव , पिंपळा, खुंटेवाडी, धामणगाव, दारफळ,सावरगाव येथील गावातील भजनी मंडळांनी परिश्रम घेतले.

 ग्रामस्थांच्या वतीने हभप श्री अनिल महाराज पाटील यांचा सत्कार करताना माजी  चेअरमन सयाजीराव देशमुख, सरपंच सुजित हंगरगेकर, उद्योजक अमरसिंह देशमुख, प्रदीप साळुंके, अर्जुन  पाटील दहिवडीकर,प्रकाश गाटे आदी मान्यवर...

 सत्कार करताना उद्योजक अमरसिंह देशमुख, संजय देशमुख, सत्यजित देशमुख, पत्रकार उमाजी गायकवाड आदी मान्यवर 

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
मुख्य संपादक
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments