काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे नृसिंह जयंती निमित्त येथील बसस्थानक जवळ कै. विजयसिंह देशमुख शॉपिंग कॉम्प्लेक्स समोरील मैदानात शनिवार दि.18 मे ते बुधवार दि.22 मे या कालावधीत पंचदिनी किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा किर्तन सोहळा माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, सरपंच सुजित हंगरगेकर, उद्योजक अमरसिंह देशमुख, प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे यांच्या पुढाकाराने होत आहे.
या पंचदिनी किर्तन सोहळ्याचा शुभारंभ शनिवार दि.18 रोजी दररोज सायंकाळी 8 ते 10 या कालावधीत होणार असून या किर्तन सोहळ्यात शनिवारी सायंकाळी 8 ते 10 या कालावधीत प्रसिद्ध युवा किर्तनकार हभप सागर महाराज बोराटे (नातेपुते) यांचे किर्तन होणार आहे. तर रविवार दि. 19 रोजी शब्द प्रभू हभप संग्राम बापू भंडारे (आळंदी), सोमवार दि. 20 रोजी वाणी भूषण हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे (नेवासा), मंगळवार दि. 21 रोजी किर्तन केसरी हभप आक्रुर महाराज साखरे (गेवराई) यांच्या किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर बुधवार दि. 22 रोजी सकाळी 10 ते 12 या कालावधीत भाषा प्रभू हभप श्री अनिल महाराज पाटील (बाबळगाव) यांचे काल्याच्या किर्तनाने व सामुदायिक महाप्रसादाने या पंचदिनी किर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे.
या किर्तन सोहळ्यात प्रसिद्ध गायनाचार्य संगीत विशारद श्री शंकर महाराज अनपट (आळंदी), गायनाचार्य संगीत विशारद श्री समाधान महाराज निचळ (आळंदी), व प्रसिद्ध मृदंग सम्राट श्री. कृष्णा महाराज कदम (आळंदी) यांच्या साथीने या किर्तन सोहळ्याला रंगत येणार आहे. तसेच काटी येथील विठ्ठल भजनी मंडळ, गाटे गल्ली भजनी मंडळ व दहिवडी, शेळगाव (आर), जवळगाव, सावरगाव, पिंपळा, खुंटेवाडी, धामणगाव, दारफळ येथील भजनी मंडळाची साथ लाभणार आहे.
तरी काटीसह पंचक्रोशीतील भाविकांनी या पंचदिनी किर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने माजी चेअरमन सयाजीराव देशमुख यांनी केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments