Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

स्व. माधवराव (काका) पाटील यांची पुण्यतिथी मुरुम शहरात साजरी

                    
मुरुम/प्रतिनिधी
  स्व. माधवराव उर्फ काका पाटील यांनी उमरगा-लोहारा तालुक्याच्या विकासासाठी स्वतःला जोखून देऊन मोठ्या मेहनतीने उभी केलेली साखर कारखानदारी, शिक्षणसंस्था, या भागातील जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी जाणीवपूर्वक राबविलेल्या जलसिंचनाच्या लहान-मोठ्या पाणी योजना, बेनीतुरा मध्यम प्रकल्पाची उभारणी त्यातून झालेला कृषी, सहकार व औद्योगिक विकास. दरम्यान या परिसरात कुठलाही साखर कारखाना नसल्याने काकांनी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे हाल व  खाजगी साखर कारखानदार यांच्याकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी सहकारी तत्वावरील मुरूमच्या माळरानावर श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा झाला पाहिजे. म्हणून साखर उद्योग उभारण्याचे ठरवून विकासाची पहिली मुहूर्तमेढ सन १९९४ साली विठ्ठलसाईच्या निमित्ताने रोवली गेली.

 साखर कारखान्याच्या अगोदर काकांनी सन १९७० मध्ये नगर शिक्षण विकास मंडळ, मुरूम या शिक्षण संस्थेचा पाया रचला. पुढे त्यांचे जेष्ठ चिरंजीव माजी मंत्री बसवराज पाटील व त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी त्यावर कळस चढविला. तसेच युवा नेते ऊमरगा जनता सहकारी बॅकेचे अध्यक्ष शरणजी पाटील हे वडीलांचा व काकांचा आदर्श घेऊन पुढे त्यांच्या विचारसरणीनुसार कार्यतत्पर राहून वाटचाल करीत आहेत. 

 स्व. माधवराव (काका) पाटील यांची पुण्यतिथी मुरुम शहरात साजरी करण्यात आली. प्रारंभी स्व.माधवराव पाटील यांच्या समाधीस्थळी बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील स्व. माधवराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शनिवारी (ता.२०) रोजी बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, आळंदचे माजी नगराध्यक्ष विठलराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, पंचायत समितीचे माजी सभापती राजू पाटील, प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव जाधव गुरुजी, ॲड.संजय बिराजदार, ॲड.व्ही.एस.आळंगे, प्रा.दिलीप गरुड, रशिद गुत्तेदार, सतिश पवार,  माणिक राठोड, मल्लिनाथ दंडगे,  धनराज मंगरुळे, दत्ता चटगे,  स्वामी गुरुजी, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, सी.टी. बिराजदार, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथनी आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शहरातील कै. माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय, प्रतिभा निकेतन विद्यालय, मुरुम, कोथळी, भुसणी व नूतन विद्यालय, मुरुम, तसेच विठलसाई सहकारी साखर कारखाना आदी ठिकाणी कै. माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.                   
 स्व. माधवराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करताना बापूराव पाटील, विठलराव पाटील, राजू, पाटील, प्रशांत पाटील, व्यंकटराव जाधव गुरुजी, दिलीप भालेराव, अशोक सपाटे आदी

Post a Comment

0 Comments