काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि. 31 रोजी सकाळी 11 वाजता येथील सहकारी बॅंकिंग क्षेत्रातील आघाडीच्या वित्तीय संस्थांपैकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डीव्हीपी दि पिपल मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सोसायटी लिमिटेडच्या काटी शाखेत परंपरेनुसार श्रावण मासानिमित्त बॅंकेचे चेअरमन सुरेश सुरेश पाटील (दहिवडीकर) यांच्या मार्गदर्शनानूसार व अर्जुन सुरेश पाटील (दहिवडीकर )यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्यनारायण महापूजा प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके यांच्या हस्ते संपन्न झाली.
यावेळी बॅंकेचे ठेवीदार पंढरी अंबादास भोसले (रा. सारोळा), पिग्मी एजंट राजकुमार माने, माजी सैनिक संतोष थिटे, श्रीकांत गाटे, शेतकरी नाबाजी ढगे, उपस्थित मान्यवर कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, यांचा बॅंकेच्या वतीने अर्जुन पाटील, बॅंकेचे विभागीय अधिकारी सुरज गरड यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पंढरी अंबादास भोसले (रा. सारोळा), पिग्मी एजंट राजकुमार माने,माजी सैनिक संतोष थिटे, श्रीकांत गाटे, शेतकरी नाबाजी ढगे, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर,अर्जुन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे,अनिल गुंड, पत्रकार उमाजी गायकवाड, बॅंकेचे विभागीय अधिकारी सुरज गरड,भागवत गुंड,सुनिल गायकवाड, संपत पंखे, सचिन साळुंके, सुहास सोलंकर, कर्मचारी गणेश गाटे,कृष्णा माने आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments