Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरतात. ---प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड

गुंजोटी:- समकालीन समाजाला दारिद्र्य,बेरोजगारी,धर्मांधता, जातीवाद यासारखे अनेक ज्वलंत प्रश्न भेडसावत आहेत. त्यामुळे उपेक्षित समाज घटकांना जीवन जगणे कठीण बनले आहे.अशा प्रसंगी मरणप्राय जीवन जगणाऱ्या माणसालाही जगण्याची ताकद देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरतात असे प्रतिपादन लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड यांनी केले.

उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

विचारपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड, दिलीप गायकवाड, डॉ.रमेश पात्रे, नळदुर्ग येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गायकवाड, उपसरपंच आयुब मुजावर,रवी देशमुख,शेषराव खंडागळे, पत्रकार विशाल देशमुख, डॉ.बालाजी कोनाळे, श्रीनिवास हिरवे, योगेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सौ.चव्हाण, मा.शेखताई, सौ.जेटीथोर ताई यांची उपस्थिती होती. 

याप्रसंगी बोलताना डॉ. गायकवाड पुढे म्हणाले की, जगण्याच्या दाहक अनुभवांमधून उदयास आलेले अण्णाभाऊ साठे यांचे विचारकार्य माणुसकीच्या प्रतिष्ठापनेसाठी आसुसलेले होते. असमानता आणि विषमतेचे समूळपणे उच्चाटन घडून आले पाहिजे म्हणून त्यांनी आयुष्यभर लढा दिला.त्यांना अभिप्रेत असणारा शोषणमुक्त,समताप्रधान समाज निर्माण करण्यासाठी आपण सांघिकपणे प्रयत्नशील असले पाहिजे.मी खेडूत आहे,गरीब आहे, फारसे काही करू शकत नाही.हा न्यूडगंडभाव मनात न बाळगता मी अण्णाभाऊ साठे यांचा सच्चा अनुयायी आहे, त्यांना अपेक्षित असणारा समाज निर्माण करण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करणार आहे या जाणिवेतून आपण सार्वजनिक जीवनात सक्रिय बनले पाहिजे,असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षपदावरून बोलताना शिवाजी गायकवाड म्हणाले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध असून आपण शिक्षण घेऊन आपली प्रगती करावयास हवी. राजकारणाचा आधार घेऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल गायकवाड यांनी केले तर संचालन प्रा.डॉ.रमेश पात्रे यांनी केले.आभार राजेंद्र पाटोळे यांनी मानले.कार्यक्रमास गावातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments