काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुहास सुभाष सोलंकर यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी पल्लवी चंद्रकांत जामगावकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
विस्तार अधिकारी अर्जुन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक वर्षे 2024 ते 2026 सालासाठी
झालेल्या पालक सभेच्या मेळाव्यात गुरुवार दि.29 रोजी ही निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी सभेत विविध समित्या गठित करण्यात आल्या.
यावेळी 2024-25 ते 2025-26 या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुहास सोलंकर यांची तर उपाध्यक्षपदी पल्लवी जामगावकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित पालकांमधून 12 सदस्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. यामध्ये
शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून सुनिल दत्तात्रय गायकवाड यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर विस्तार अधिकारी अर्जुन जाधव,प्रशालेचे मुख्याध्यापक अमिन शेख यांच्या हस्ते नुतन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोलंकर व श्रीमती उपाध्यक्ष जामगावकर, शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी नूतन अध्यक्ष सुहास सोलंकर यांनी सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या विकासासाठी आदर्शवत काम करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी विस्तार अर्जुन जाधव, प्रशालेचे मुख्याध्यापक अमिन शेख यांच्यासह पालक, शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments