मुरूम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मुरूम येथोल महादेव नगर येथे बुधवार दि.28 रोजी श्री महादेव मंदिरामध्ये शिवलिंग प्राणप्रतिष्ठापणा व कळशारोहन सोहळा संपन्न झाला.
नारळ मठ मठादिपती श्री.म.नि. प्र. जय मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभहस्ते व नंदगाव मठाचे मठादिपती श्री.म.नि. प्र. राजशेखर महास्वामी, जेवळी मठाचे मठादिपती श्री.म.नि. प्र. गंगाधर महास्वामी यांच्या आशीर्वाचंनाने व चरमूर्ती मठाचे मठादिपती श्री.म.नि. प्र. सिद्धमल महास्वामी, केसरजवळगा मठाचे मठादिपती श्री.म.नि. प्र. विरंतेश्वर महास्वामी,उस्तुरी मठाचे मठादिपती श्री.म.नि. प्र. कोरनेश्वर महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात आणि डिसीसी बँकेचे चेअरमन तथा काशी,उजैन,श्रीशैल पिठाचे संचालक बापूराव पाटील, पंचायत समिती उमरगा माजी सभापती ऍड राजासाहेब पाटील, युवानेते प्रशांत पाटील, पंचायत समिती उमरगा माजी सभापती मदन पाटील, माजी सरपंच कंटेकुर गोविंद पाटील, मुरूम नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२८ ऑगस्ट वार बुधवार रोजी सकाळी ११ वाजता महादेव नगर येथील महादेव मंदिरात शिवलिंग प्राणप्रतिष्ठापणा व कळसारोहन सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी शिवलिंगचे विधिवत पूजन, कळसाचे महादेव नगर येथे महिला भगिनींनी डोक्यावर कळस घेऊन वाजत-गाजत प्रदक्षिणा संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवलिंग प्राणप्रतिष्ठापणा व कळसारोहन सोहळा असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी राजशेखर महास्वामी, गंगाधर महास्वामी, कोरनेश्वर महास्वामी,सिद्धमल महास्वामी आदींचा आशीर्वाचन कार्यक्रम पार पडला याप्रसंगी शहरातील असंख्य भाविक भक्तांची उपस्थिती होती. मंदिर समितीच्या वतीने शंकर गणेश मंडळ पदाधिकारी, शिवा दुर्गे, सागर खुणे, अविनाश च्यारे, सचिन फनेपुरे,अशोक अंतरेड्डी,राजकुमार लामजाने, गुरुशांत स्वामी, गणेश गुरव,सुशील बोंडवे, बंडू बेळ्ळे, मल्लिनाथ बेळ्ळे, बसवराज पनाळे, बबलू तोडकरी, बाळू विभूते, प्रकाश फनेपुरे, प्रशांत स्वामी,राहुल सर्राट्टे, सागर धुमुरे,प्रकाश भोसले, आकाश च्यारे, ओम भोसले, विकास च्यारे, प्रवीण पंडित,दुधाराम जाधव, राचप्पा दुर्गे,गौरी सरसंबे,ओमकार ओंबतटक्के, राहुल जमादार,महांतेश दुर्गे आदींनी सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,प्रास्ताविक आभार धनराज हळ्ळे यांनी मानले.
0 Comments