Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तेरणा धरणाचे तेरणा बचाव संघर्ष समितीकडुन जलपुजंन; धरणातील पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

ढोकी/सुरेश कदम 
धाराशिव तालुक्यातील सर्वात मोठे व तेरणा परिसरातील लाखो शेतक-याची लक्ष्मी असणारे तेरणा धरण यावर्षी सन 2024 रोजी शंभर टक्के भरले असून या  धरणाचे विधिवत पुजा अर्चा करुन जलपूजन तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने  बुधवार दि.28 रोजी करण्यात आले.

तेरणा धरण ओव्हर फुलो झाल्याने धाराशिव, तेर, ढोकी, तडवळा व थोडसरवाडी या गावातील ग्रामस्थ तहान भागली आहे तसेच  तेरणा पट्यात ऑक्टोबर नंतर ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड होईल असे शेतक-यातुन बोलले जात आहे यंदा तेरणा धरण लवकर भरल्यामुळे धरण पाहण्यासाठी हौसे पर्यटक फुलहाऊस गर्दी करत आहेत.

 तेरणा बचाव संघर्ष समितीकडुन बुधवार दि.28 रोजी तेरणा धरणाची विधीवत पुजा अर्चा करुन जलपूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.

 यावेळी तेरणा बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल वाकूरे, उपाध्यक्ष मंगेश तिवारी, कोषाध्यक्ष हनुमंत उर्फ बबलू शिरसाट, दैनिक पुण्यनगरीचे  पत्रकार सुरेश कदम,  शशीकांत भुतेकर, चोपदार हभप शंकर केंचे, अब्रार काझी, किशोर तिवारी,गुणवंत सुतार , दत्ता धावरे, भारत कोकाटे अनिल टकले यांच्यासह पाणी पाहणारे पर्यटक होते.

    धरणातील पाण्याची पाहणी करुन धरणातील पाण्याचा आनंद घेतला पर्यटक.....

Post a Comment

0 Comments