मुरुम/प्रतिनिधी
कुठलीही पतसंस्था ही सभासद, ठेवीदार व कर्जदार यांच्या सहकार्यावर चालत असते. या पतसंस्थेची वाटचाल केवळ सभासदाच्या सहकार्यामुळे झाल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव श्रीकांत (राजू) मिणीयार यांनी केले.
व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. २२) रोजी रत्नमाला मंगल कार्यालयात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी बालाप्रसाद काबरा होते.
यावेळी संस्थेचे चेअरमन उमेश कारभारी, व्हाईस चेअरमन अशोक चव्हाण, सचिव श्रीकांत मिणीयार, सुरेश रणसुरे, दत्तात्रय गिरीबा, रविंद्र ख्याडे, अशोक जाधव, बाबुराव हंगरगे सर्व संचालक मंडळ मंडळाची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्व. माधवराव (काका) पाटील, गुंडांप्पा मंगरूळे, संचालक स्व. भगवानदास झंवर, वीरभद्र सोलापूरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. पुढे बोलताना मिणीयार म्हणाले की, सभासदाच्या विश्वासाला साथ देत या पतसंस्थेने मार्च २०२४ या आर्थिक वर्षात १८ लाख ८३ हजार ३२३ रुपयाचा नफा झाला आहे. या संस्थेचे ५६२ सभासद असून सभासदांना यंदा बारा टक्के लाभांश देण्यात येणार आहे. या पतसंस्थेच्या ठेवी ७ कोटी ३१ लाख ६५ हजार ५३१ रुपयाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक व अहवाल वाचन सिद्राप्पा तुगावे यांनी केले. सूत्रसंचलन बाळासाहेब गिरीबा तर आभार सिध्दू स्वामी यांनी मानले. यावेळी बँकेचे सभासद, व्यापारी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
मुरूम, ता. उमरगा येथील व्यापारी नागरी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी श्रीकांत मिणीयार बोलताना उपस्थित संचालक मंडळ व अन्य.
0 Comments