Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

भाजप प्रणित सरकारच्या एकाधिकारशाही विरोधात तुळजापूर विधानसभा ताकदीने लढवणार; कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभेसाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन- -माजी मंत्री मधुकरराव चव्हाण


काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे काटी जिल्हा परिषद गटातील कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा जनसंवाद  मेळावा रविवार दि.22 रोजी सायंकाळी 7:30 वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. 

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण जनसंवाद मेळाव्यात संबोधित करताना....

यावेळी कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यात  विविध विकास कामे करण्यात आली असून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्व घटकांना दिलेले प्रतिनिधित्व दिल्याचे सांगून पक्षाने केलेल्या  विकासकामांच्या  जोरावर आणि सध्याच्या भाजप प्रणित राज्य सरकारच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे  सांगितले.

तसेच ही निवडणूक ताकदीने लढवून तुळजापूर विधानसभा निश्चितपणे जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी उपस्थित कॉंग्रेस कार्यकर्त्यांना देत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसच्या माध्यमातून करण्यात आलेली विकास कामे जनतेसमोर ठेवून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन जनसंवाद  मेळाव्यातून  त्यांनी यावेळी केले.

यावेळी मुकुंद डोंगरे, ऋषी मगर, ॲड.ढवळे, सावरगावचे माजी सरपंच रामेश्वर तोडकरी, सरपंच  परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरकर, अमर माने, चंद्रकांत काटे,गौरीशंकर कोडगिरे, रवी अंबुरे,भागवत मंडलिक, शिवाजी गायकवाड,धनंजय काशीद,प्रताप निंबाळकर,मोहन जाधव, किशोर मिर्जे,सागर गंजे, मदन फंड कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments