उमरगा/प्रतिनिधी
पंढरपूर, लातूर व नेवासा येथे धनगर जमातीच्या एस. टी. (अनुसूचित जमाती) प्रवर्ग अंमलबजावणीसाठी चालू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उमरगा येथे स्व. बाळासाहेब ठाकरे चौकात सोमवारी (ता. २३) रोजी उमरगा तालुका सकल धनगर जमातीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जमात बांधवांसमोर
डॉ. आर. डी. शेंडगे, डॉ. विजयकुमार बेडदुर्गे, प्रा. डॉ. महेश मोटे, सौ. कालिंदाताई घोडके, शिवाजीबुवा गावडे, मोहनराव दूधभाते, राघवेंद्र गावडे यांनी धनगर जमातीच्या एस. टी. प्रवर्ग अंमलबजावणी संदर्भात मनोगत व्यक्त केले.
धनगर एस. टी. अंमलबजावणीमध्ये इतर कोणत्याही जमातीचे नुकसान होणार नसून त्यांच्या मुळ आरक्षणाला कसलाच धक्का लागणार नसून कांही नेते खोडसाळपणाने लोकांमध्ये भ्रम पसरावत असल्याचे नमूद केले. आमचा मुळचा एन. टी. (क) कोटाच आम्हाला असणार असल्याने भ्रम पसरवणाऱ्यांनी मनोभावे स्वागत करावे, असे आवाहन केले. गजढोल ताशांचा गजर करत आरक्षणविषयक घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
आंदोलकांनी दोन तास मुख्य मार्ग रोखला, नायब तहसीलदार काजळे यांनी निवेदन स्वीकारले
आंदोलकांनी उमरगा येथील मुख्य मार्ग दोन तास रोखून ठेवला होता. दरम्यान नायब तहसीलदार श्री. रतन काजळे यांनी आंदोलन स्थळी येवून निवेदन स्विकारले व मागणीचे निवेदन शासनाला पाठविण्याची ग्वाही दिली. तसेच पोलिस ठाणे उमरगाचे श्रीकांत भराटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी बी. एच. बेडदूर्गे, डॉ. किशोर घोडके, डॉ. विक्रम जीवनगे, जालिंदर सोनटक्के, सरपंच शिवाजी सुरवसे, देविदास बनसोडे, गुंडू दूधभाते, प्रा. डॉ. सायबण्णा घोडके, प्रा. नारायण सोलंकर, डॉ. अनिल गाडेकर, ॲड. अरूण हेडे, नगरसेवक गोविंद घोडके, प्रा. विकास दूधभाते, राजू दुधभाते, प्रा. आप्पाराव सोनकाटे, खंडू दूधभाते, संभाजी दुधभाते, वसंत सुर्यवंशी, मारुती घोडके, तानाजी घोडके, कमलाकर मोटे, सरपंच कालिदास लवटे, दिलीप बनसोडे, विजयकुमार सोनकटाळे, काशिनाथ दूधभाते, गौतमीबाई होळकर, महिला संघटना, गुंजोटी येथील अहिल्यादेवी प्रतिष्ठान कार्यकर्ते यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्येने महिला व पुरूषांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. सुत्रसंचालन प्रशांत अडसुळे तर आभार राजू धनकटे यांनी मानले.
उमरगा, ता. उमरगा येथे धनगर आरक्षण अंमलबजावणीचे निवेदन रतन काजळे यांना देताना आर. डी. शेंडगे, विजय बेडदुर्गे, महेश मोटे, कालिंदाताई घोडके, शिवाजीबुवा गावडे, मोहन दूधभाते, राघवेंद्र गावडे आदींसह समाज बांधव व अन्य.
0 Comments