Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे राष्ट्रीय पोषण माह सप्ताह निमित्त पोषण अभियानात विविध उपक्रमासह महिला मेळावा संपन्न

काटी/उमाजी  गायकवाड
सुपोषित भारत, कुपोषित भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान शासनाच्या विविध विभागामध्ये अभिसरण पध्दतीने पोषण अभियान कार्यक्रम देशपातळीवर राबविण्यात येतो. त्याअनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा विभागातून काटी येथील विठ्ठल मंदिरात   मंगळवार दि. 24 रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना तुळजापूर अंतर्गत प्रकल्प अधिकारी किशोर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोषण माह निमित्त महिला मेळावा घेण्यात आला.

यावेळी सरपंच आशाताई सुजित हंगरकर,उपसरपंच शुभांगी प्रमोद काटे,पर्यवेक्षीका श्रीमती स्मिता घोडके,पिरॅमल फाउंडेशन संस्थेच्या कार्यकर्त्यां श्रीमती प्रगती मॅडम,पोलीस पाटील सुनंदा म्हेत्रे यांची प्रमुख  उपस्थिती होती. 

या मेळाव्यात 125 महिला आणि 35 किशोरी मुलींनी पौष्टिक आहार बनवून आणले होते. तसेच यावेळी गरोदर मातेचे ओटी भरण कार्यक्रम  घेण्यात आला.

यावेळी महिलांना आहाराबाबत  समुपदेशन करताना पर्यवेक्षिका स्मिता घोडके महिलांनी आहार कसा घ्यावा,किती वेळा घ्यावा, शिजवताना घ्यावयाची काळजी, लोहयुक्त पदार्थ सेवन करण्यासाठी कोणते सेवन करावे,स्त्रियांचे आजार,कुपोषण रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी,पौष्टिक आहार, किशोरवयीन मुलींकरीता मासिक पाळी आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तर पिरॅमल फाउंडेशन संस्थेच्या कार्यकर्त्यां श्रीमती प्रगती मॅडम यांनी लिंग भेद, बाळाचे पहिले एक हजार दिवस,बेटी बचाव,बेटी पढाओ यावर सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंगणवाडीच्या साधना राऊत,वनिता जामगावकर, अक्षरा शिंदे,तोलन घायाळ, मनीषा जाधव,अन्वर्बि शेख, सुरेखा गायकवाड,शांता ढगे, बायाडाबाई कदम,संध्या सपकाळ,नंदिनी क्षीरसागर,सिंधू ढगे,अर्चना काटे,शामल होग्ले व साधना साळुंके यांनी परिश्रम घेतले.

महिला मेळाव्यात उपस्थित महिलांचा सन्मान करण्यात आला....


Post a Comment

0 Comments