Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

बिरूदेव मंदिर उमरगा येथे अन्नछत्र सभागृहाचे भूमिपूजन


उमरगा/ प्रतिनिधी 
दात्यांच्या अंतःकरणात दानत असली की दान करण्याचे पवित्र कार्य हातून घडते. समाजामध्ये अशा दात्यांमुळे विविध निर्माण कार्ये पार पाडताना मोलाची मदत होते असे मत अन्नछत्र सभागृहासाठी जमीन दान दिलेले अंकुश गुंडाजी शिंदे यांच्या सत्काराप्रसंगी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी गौरवोद्गार काढले.
         
उमरगा येथील बिरूदेव मंदिर हे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश येथील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असल्याने येथे वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. भाविकांकरीता चालू असलेल्या अन्नछत्रासाठी सुसज्ज व सुविधा संपन्न असे सभागृह व्हावे यासाठी ७५ लक्ष रूपये आमदार ज्ञानराज चौगुले यांनी निधी उपलब्ध केला असून सदरील सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन आमदार चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आमदार चौगुले बोलत होते.

अंकुश शिंदे यांचा झाला सत्कार
उमरगा येथील अंकुश गुंडाजी शिंदे यांनी बिरूदेव मंदिराच्या अन्नछत्रासाठी लागणारी तीस गुंठे जमीन दान दिली दिल्याने मंदीर समितीच्या वतीने अंकुश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, या दानामुळे वडील गुंडाजी शिंदे यांची इच्छा पूर्ण केल्याचे समाधान आहे. मंदिर समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले. 

आमदार चौगुले यांच्या हस्ते अन्नछत्र सभागृहाचे भूमिपूजन 
सभागृह बांधकामासाठी ७५ लक्ष रूपये निधी 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे हे होते तर जितेंद्र(दादा) शिंदे, डॉ मल्लीनाथ मलंग, सत्कार मूर्ती अंकुशराव शिंदे, युवानेते किरण गायकवाड, शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, डॉ आर डी शेंडगे, ॲड प्रवीण तोतला या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष सतीश साळुंके, शाखा अभियंता बी जी बारसे,जगन्नाथ घोडके, डॉ किशोर घोडके, बिरूदेव मंदिर समितीचे अध्यक्ष बालाजी घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती  जितेंद्र शिंदे यांनी अन्नदान हे पवित्र कार्य असल्याने शक्य तितक्या लोकांनी या कार्यात सहभाग नोंदवून एक श्रेष्ठ अनुभव घेण्याचे आवाहन यावेळी केले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मंदिर समितीचे पुजारी वृंद,जालिंदर सोनटक्के, दिलीप घोडके, राघवेंद्र गावडे, प्रा अशोक दुधभाते, शिवाजी बुवा गावडे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बिराजदार आदिंची उपस्थिती होती. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.जान्हवी सोनटक्के तर
आभार कु. महादेवी घोडके हिने मानले. भुमिपूजनावेळी बिरूदेव मंदिर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments