मंगरुळ/चांदसाहेब शेख
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थिनी गौसिया आदमशा फकीर हिने 95 टक्के गुण प्राप्त करत प्रशालेतून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 दहावी बोर्ड परीक्षा (एसएससी) मार्च महिन्यात पार पडल्या आहेत त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये गौसिया फकीर हिने सर्वच विषयात विशेष प्राविण्य मिळवले असून मंगरुळ येथील मुलींची शैक्षणिक पार्श्वभूमी अधोरेखित केली असून गेल्यावर्षीप्रमाणेच याही वर्षी मुलींची पकड या परीक्षेवर दिसून आली जिद्द,चिकाटी, प्रचंड आत्मविश्वास व मेहनत केल्यास यश हमखास पाहायला मिळते याची प्रचिती मला झाल्याचे प्रतिपादन गौसिया फकीर हिने सत्काराला उत्तर देताना सांगितले.
तिच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुकुंद डोंगरे, सरपंच विजयालक्ष्मी डोंगरे, पोलीस पाटील लक्ष्मण माळी, उपसरंचप गिरीश डोंगरे, मुख्याध्यापक शिवाजी राठोड पत्रकार चांदसाहेब शेख, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब जेटीथोर, गोविंद डोंगरे यांनी सत्कार केला व पुढील उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments