Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे शेत रस्ता कामासाठी शेतकऱ्यांचा सहभाग

काटी/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार  दि.14 रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये अमोल आरगडे ते अनिल आगलावे यांच्या शेतापर्यंत जाणे येणेसाठी शेत रस्ता करण्यासाठी या मार्गातील जवळपास पंधरा शेतकरी एकत्र येऊन लोकसहभागातून ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत सुरवसे यांचेकडे चाळीस हजार रुपये जमा केले.
 
भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशाची बहुसंख्य लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. 
आजच्या यांत्रिकीकरणांमध्ये शेतीमध्ये पेरणी, पाळी, नांगरणी, अंतरमशागत, कापणी, मळणी इतर विविध कामे यंत्रामार्फत करण्यात येत आहेत. शेतीमाल विक्रीसाठी बाजारात पोहचविण्याकरीता तसेच विविध यंत्रसामुग्री शेतीकामासाठी शेतीपर्यंत पोहचण्यासाठी शेतीला सर्वऋतूत व बारमाही शेत रस्त्यांची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या पंधरा शेतकऱ्यांनी एकत्रित येत ग्रामपंचायत मध्ये चाळीस हजार लोकवाटा जमा केला. या लोकावाट्याच्या माध्यमातून शेत रस्त्यासाठी येणाऱ्या वाहनांचा डिझेल खर्च भागणार आहे.

यावेळी ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत सुरवसे, माजी सरपंच शामराव आगलावे,संपत पंखे, अविनाश देशमुख, मोहन आगलावे, अनिल आगलावे, सुनिल गायकवाड आदी शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments