मंगरुळ:- चांदसाहेब शेख
महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी अब्दुल शेख यांची सोलापूर येथे संघटनेच्या विभागीय मेळाव्यात रविवार 1जून रोजी नियुक्तीपत्र, शाल, पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन निवड करण्यात आली आहे.
अब्दुल शेख यांनी यापूर्वी मुस्लिम आरक्षणासाठी वेळोवेळी आवाज उठवला होता व वेळप्रसंगी तीव्र आंदोलनही छेडले होते तसेच त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात सातत्याने हिरीरीने सहभागी असतात त्यांच्या याच सामाजिक कामाची दखल घेऊन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम भाई मुजावर यांनी सदरची निवड सोलापूर जिल्हाध्यक्ष शहाबुद्दीन नदाफ यांच्या शिफारशीवरून व सूचनेनुसार केली आहे सोलापूर येथे संपन्न झालेल्या या विभागीय मेळाव्यास राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते अब्दुल शेख यांच्या निवडीबद्दल संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे
सर्व सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी व संघटना वाढीसाठी प्रयत्नशील राहणार
संघटनेच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील शिक्षण , रोजगार सामजिक व तळागाळातील त्रस्त लोकांना न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून संघटनेचे जाळे जिल्हाभर पोहचवून संघटना वाढीसाठी जीवाचे रान करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणार आहे
--अब्दुल शेख
0 Comments