धाराशिव:- पंढरपूर येथील श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा विधानसभेचे आमदार अभिजीत (आबा)पाटील यांच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त दि पिपल मल्टीस्टेट को.आँप.क्रिडीट सोसायटी लिमिटेडच्या धाराशिव शाखेच्या वतीने धाराशिव शाखेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित शिबिरात 30 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.
या शिबिराचे उद्धघाटन दि.पिपल मल्टीस्टेट को.आँप.क्रिडीट सोसायटीचे चेअरमन सुरज सुरेश पाटील (दहिवडीकर) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दि.पिपल मल्टीस्टेट को.आँप.क्रिडीट सोसायटीचे चेअरमन सुरज सुरेश पाटील (दहिवडीकर), विठ्ठल नागरी पतसंस्थेचे चेअरमन विक्रम (भैय्या )पाटील, फुलाई मल्टीस्टेटचे चेअरमन प्रदीप खामकर,अर्जुन सुरेश पाटील (दहिवडीर), दि.पिपल मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद भुतेकर,श्री सुरवसे,सोमनाथ कवरे,नुपूर नायगावकर, जनरल मॅनेजर शशिकांत जगताप आदी मान्यवरांसह दि. पिपल मल्टीस्टेटचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
मुख्य संपादक
Only न्यूज धाराशिव
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments