तुळजापूर :- तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त बुधवार दि.3 रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. दररोज रक्ताची भासणारी गरज आणि दुसरीकडे रक्ताची निर्माण होणारी टंचाई लक्षात घेता सामाजिक जाणिवेतून पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी,पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रावण पवार यांच्या पुढाकारातून पुजारी नगर गणेशोत्सव मंडळाकडून रक्तदान शिबीर घेण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन मंडळाच्या अध्यक्षांचे श्रावण पवार व पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरादरम्यान रक्तसंकलनासाठी सोलापूर येथील मलिकार्जुन रक्तपेढीचे रक्तसंक्रमण समुदेशक सत्यम गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील टीमने मोलाची कामगिरी बजावली. तसेच रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी पुजारी नगर गणेशोत्सव मंडळातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments