काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी व खुंटेवाडी येथे मंगळवार दि.2 रोजी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला राज्य शासनाकडून 8 पैकी 5 मागण्या मान्य केल्याने पाटील यांनी उपोषण सोडत आंदोलन मागे घेतले.पाचव्या दिवशी या आंदोलनाला यश मिळाल्यामुळे येथील सकल मराठा समाज बांधवानी पेढे वाटून, "मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है", "एकच मिशन मराठा आरक्षण", "हम सब जरांगे", "एक मराठा लाख मराठा" अशा घोषणा व गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष साजरा केला.
यावेळी काटी व खुंटेवाडीतील सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments