तुळजापूर:- तुळजापूर शहरात सध्या भारतीय सष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण परियोजना, ईकाई सोलापूर अंतर्गत तुळजापूर नळदुर्ग राष्ट्रीय महामार्ग 652 यारस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरनासह दुभाजकाचे काम सुरु आहे. गोलाई चौक ते लातूर बायपास पर्यंत सैनिकी शाळा, तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय,तालुका क्रीडा संकुल,जवाहर नवोदय विद्यालय, आय.टी.आय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अशा शैक्षणिक संस्था असून या रस्त्यावरती विद्यार्थ्याची ये-जा सुरू असते सध्या रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने येणारी वाहने वेगाने येत आहेत त्यामुळे अपघात होत आहेत व विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी असुरक्षित वाटत असल्याने नुतन नगरसेवक सौ.अश्विनी विशाल रोचकरी यांच्या सहीचे पत्र नुतन नगरसेवक रामचंद्र (आबा) रोचकरी, त्यांचे बंधू निलेश रोचकरी यांनी शुक्रवार दि.2 रोजी सोलापूर येथील भारतीय राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन निवेदनात गोलाई चौक ते मंगरूळपाटीपर्यंत गतिरोधक त्वरित बसविण्यात यावे व यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या उपयायोजना कराव्यात अशी विनंती निवेदनात केली आहे.
कार्यकारी अभियंता यांना नुतन नगरसेवक सौ.अश्विनी विशाल रोचकरी यांची स्वाक्षरी आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
मो.नं.9923005236
0 Comments