Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटगाव गटात जिल्हा परिषद सदस्यांसाठी स्थानिक उमेदवार द्यावा; गेटकेन उमेदवार नको; तामलवाडी पार पडलेल्या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांचा सुर...

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटगाव जिल्हा परिषद गट अंतर्गत तामलवाडी येथे भारतीय जनता पार्टी काटगाव जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांची बैठक गुरुवार 1 जानेवारी रोजी पार पडली. 

या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीस गटातील व गणातील संभाव्य उमेदवार बूथ प्रमुख व गट प्रमुख उपस्थित होते. सदर बैठकीतून एकच एकच चर्चा करण्यात आली. संभाव्य उमेदवार हा स्थानिकच व गटातीलच असावा असा जोर धरण्यात आला. बैठकीत पक्षाच्या निष्ठावंत स्थानिक उमेदवारला तिकीट देण्यात यावे असाही सुरू निघाला संभाव्य उमेदवारांनी थोडक्यात परिचय व मनोगत व्यक्त केली.

या बैठकीस गटप्रमुख यशवंत लोंढे,गण प्रमुख बाबा बेटकर, बालाजी शिंदे संभाव्य उमेदवार ज्ञानेश्वर माळी, विजय शिंगाडे,राम जवान,निवृत्ती माळी, दादासाहेब घोडके, रविकांत गुरव, रवी माळी, मधुकर चेंडके,दत्तात्रय वडणे, इंद्रजीत घोटकर,रामलिंग सगर, सुधीर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, युसुफ मुलानी, तमीज पटेल आदी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments