Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

प्रभाग अकरा मधील नवीन न्यायालय व लोकवस्ती जवळील घनकचरा डेपो इतरत्र हलविण्यासाठी नुतन नगरसेवक रोचकरी यांची निवेदनाद्वारे नगरपरिषदेकडे मागणी ; लोकनियुक्त नुतन नगराध्यक्ष विनोद (पिंटू) गंगणे यांचेकडून गांभीर्याने दखल लवकरच कचरा डेपो इतरत्र हलविण्यासाठी काम हाती घेणार असल्याचे आश्वासन

.                                     (संग्रहित छायाचित्र)
तुळजापूर:- तुळजापूर शहरातील प्रभाग क्रं 11 मधील सद्यस्थितीत असलेल्या घनकचरा डेपो इतरत्र हलविण्याबाबतचे लेखी निवेदन प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेवक रामचंद्र आबा रोचकरी व नगरसेविका सौ.अश्विनी विशाल रोचकरी कचरा डेपो इतरत्र हलविण्यात बाबतचे निवेदन  सोमवार दि.5 रोजी नगरपरिषदेत दिले असून निवेदनात तुळजापूर शहरातील घनकचरा डेपो नवीन न्यायालय व याच इमारतीजवळ नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या जवळच शहरातील घनकचरा डेपो आहे. 

लोकसंख्या कमी असल्याने पूर्वीच्या काळी घनकचरा विल्हेवाटीची फारशी समस्या नव्हती परंतु सध्या शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे प्लॅस्टिक वस्तू व अन्य घनकचरा उघड्यावर टाकला जात असल्याने तो कुजून दुर्गंधी सुटते आहे. दिवसेंदिवस प्रदुषण वाढत आहे.सदरील घनकचरा संकलन डेपोमुळे परिसरात दुर्गंधी,डास, किटकांच्या प्रादुर्भाव वाढल्याने,अस्वच्छता पसरल्याने पर्यायाने कचरा डेपो परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी लेखी व तोंडी स्वरुपात नाराजीचा सूर उमटत आहे.

कचरा डेपो जवळील परिसर नवीन न्यायालय, लोकवस्तीचा असल्याने या भागातील महिला, वयोवृद्ध नागरिक,लहान बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत असलेला घनकचरा व्यवस्थापन डेपो इतरत्र हलविण्यात यावा अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात प्रभाग क्रमांक 11 चे नुतन नगरसेवक रामचंद्र रोचकरी,नगरसेविका सौ.अश्विनी विशाल रोचकरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

गांभीर्याने दखल लवकर कचरा डेपो इतरत्र हलविण्यात येणार 

या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन लोकनियुक्त 
नुतन नगराध्यक्ष विनोद (पिंटू) गंगणे यांनी हा कचरा डेपो इतरत्र हलविण्यासाठी लवकरच काम हाती घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments