Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर येथे नुतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार व सुसंवाद;स्थानिक पत्रकारांसाठी पत्रकार भवनसाठी तात्पुरती सोय; स्थानिक प्रश्नावर तुळजापूर शहरास सुंदर व स्वच्छ शहर बनविण्यास प्राधान्य देणार... --लोकनियुक्त नगराध्यक्ष विनोद (पिंटू) गंगणे

तुळजापूर/उमाजी गायकवाड 
तुळजापूर येथे लोकनियुक्त नुतन नगराध्यक्ष विनोद (पिंटू) गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली व नुतन नगरसेवक विशाल भैय्या रोचकरी यांच्या संकल्पनेतून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानून त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने मंगळवार दि. 6 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजता येथील स्कायलॅंड हॉटेल मध्ये शहरातील पत्रकार बांधवांचा लोकनियुक्त नगराध्यक्ष व नुतन नगरसेवक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भेट वस्तू देऊन सत्काराने सन्मान  करण्यात आला. तसेच पत्रकारांच्या योगदानाची दखल घेत आणि स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे संबंध दृढ व्हावेत या उद्देशाने नुतन नगराध्यक्ष,नगरसेवक व पत्रकार यांच्यातील सुसंवादाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामात पारदर्शकता वाढेल व स्थानिक प्रश्न मार्गी लागतील या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविला असल्याचे विशाल (भैय्या) रोचकरी यांनी सांगितले. 

याच कार्यक्रमात नगरपरिषदेच्या निवडणुकीत सक्रिय भाग घेणाऱ्या नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रभाग निहाय परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांना टायटनचे घड्याळ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रारंभी आयोजक नगरसेवक विशाल (भैय्या )रोचकरी यांनी शहरातील पत्रकारांचे योगदानाबद्दल कृतघ्नता व्यक्त करीत तिर्थक्षेत्र आई तुळजाभवानीच्या वास्तव्याने पवित्र असलेल्या तुळजापूरची बदनामी थांबण्यासाठी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून आपली लेखणी चालवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. 

  -नगराध्यक्ष विनोद (पिंटू)भैय्या गंगणे उपस्थित पत्रकारांना शुभेच्छा देताना.....

नुतन नगराध्यक्ष विनोद (पिंटू) गंगणे व नगरसेवक यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सत्कार आणि सुसंवादाचे आयोजन केल्याने नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विकासकामांची नगराध्यक्ष विनोद (पिंटू)भैय्या गंगणे यांनी माहिती देत पत्रकारांनी विचारलेल्या स्वच्छता,आरोग्य,अतिक्रमण,मोकाट जनावरे, भाजी मार्केट आदी प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. सुरुवातीला नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेला प्राधान्य देणार असून उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने हाती घेणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली. स्थानिक पातळीवरील प्रश्नावर पत्रकारांशी चर्चा करून आगामी काळात पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानून स्थानिक प्रशासन आणि पत्रकार यांच्यात सकारात्मक संबंध निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करीत शहराच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे प्रयत्न करावे तसेच नगरपरिषद प्रशासनाच्या  माध्यमातून व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणाऱ्या विकासकामा संदर्भात पत्रकारांनी मोलाची भूमिका बजावावी अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच पत्रकारांसाठी हडको भागात पत्रकार भवनसाठी एक गाळा देऊन पत्रकारांची तात्पुरती सोय केली जाणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली. स्थानिक नागरिकांनाही विश्वासात घेऊन शहरातील विकासकामे राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

.          --विशाल भैय्या रोचकरी शुभेच्छा देताना..

आ.तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध...
यावेळी महायुतीतील घटक पक्षातील शिवसेना शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांनी भाजपचे नेते तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व नगराध्यक्ष विनोद पिंटू गंगणे यांच्यावर केलेल्या टोकाच्या टिकेचा निषेध व्यक्त उपस्थित नगरसेवक, भाजप पदाधिकाऱ्यांनी केला व आगामी काळात तानाजी सावंत यांचा खरपूस समाचार घेतला जाईल असा इशाराही उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला.

.           प्रा. संभाजी भोसले शुभेच्छा देताना....

यावेळी नगराध्यक्ष विनोद (पिंटू) गंगणे,नगरसेवक विशाल भैय्या रोचकरी,पंडितराव जगदाळे,सज्जनराव साळुंके,सुनिल रोचकरी,राजाभाऊ देशमाने,औदुंबर कदम,दिनेश क्षिरसागर,लखन पेंदे,डॉ.अनुजा अजित परमेश्वर, किशोर साठे,माऊली भोसले,नरेश अमृतराव, सागर कदम, विजय कंदले,आनंद सावंत,आनंद कंदले, विशाल रोचकरी, अमर दाजी हंगरगेकर,रामचंद्र रोचकरी, मनोज गवळी, निलेश रोचकरी,सुहास गायकवाड,विशाल छञे, अभिजीत कदम,प्रा.संभाजी भोसले,अंबरीश जाधव,दादा खपले,राजेश शिंदे,राम चोपदार,सचिन रोचकरी, शांताराम पेंदे,पत्रकार बांधव, भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    नगरसेवक रामचंद्र आबा रोचकरी शुभेच्छा देताना...

उपस्थित नगराध्यक्ष विनोद गंंगणे,माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी,आनंद कंदले,नरेश अमृतराव, प्रा.संभाजी भोसले, विजय कंदले, राजेश शिंदे आदी जण...

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments