Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून वाणेवाडी येथे सभामंडपाचे भूमिपूजन

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी येथे गुरुवार दि.7 रोजी येथील देवी  मंदिरा समोर ग्रामपंचायतच्या खुल्या जागेत दहा लाख रुपयेच्या सभामंडपाचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष महादेव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

नवरात्र उत्सवा दरम्यान  तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे सभामंडपाची मागणी केली होती, ती पूर्ण केल्यानं येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष महादेव जाधव, लिंबराज शिनगारे, रघुनाथ वाडकर,सुमित घोडके,उमेश शिनगारे, रवी बामणकर, चंदू लोके,संतोष लोके,नागेश बामणकर, बाबा शेळके,धनु वळशिंगे,जितेंद्र मिरजे,विरेश शिनगारे, प्रकाश पाटील,मेघा वळसिंगे, दिपा बामणकर महिला व पुरुष व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments