काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दि.7 रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत विलासराव देशमुख यांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील या अवमानकारक वक्तव्याचा येथील कॉंग्रेस, शिवसेना (उबाठा), (राष्ट्रवादी शरद पवार गट) या महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अमर रहे अमर रहे विलासराव देशमुख अमर रहे अशा घोषणा देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवला.
यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरकर, माजी चेअरमन तथा कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख,गजानन देशमुख,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव,माजी सरपंच शामराव आगलावे, प्रकाश गाटे, भैरी काळे,माजी उपसरपंच जुबेर शेख,सत्यवान बोराडे, श्रावण वाघमारे, शिवलिंग घाणे,नामदेव काळे,प्रभाकर साळुंके,कादर शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
मो.नं.9923005236
0 Comments