Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आरोग्यसेवेचा 'हिरा' चमकला! धाराशिवचे तानाजी क्षीरसागर यांना राज्य शासनाचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे 'आरोग्य रत्न' पुरस्कार जाहीर! राज्यातून एकमेव आरोग्य सुपरवायझरची निवड; 22 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव; CSR फंड असो वा कोरोना काळ; क्षीरसागरांच्या अष्टपैलू कार्याची महाराष्ट्र शासनाकडून दखल

.       -तानाजी क्षिरसागर, आरोग्य सुपरवायझर

तुळजापूर/उमाजी गायकवाड 
सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 'सन 2024-25 चा राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार' जिल्हा आरोग्य विभागाचे सुपरवायझर तानाजी क्षीरसागर यांना जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, हा बहुमान मिळवणारे ते संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव आरोग्य सुपरवायझर ठरले आहेत.
मुंबईत होणार गौरव सोहळा
येत्या 22 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे आयोजित विशेष सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. प्रशस्तीपत्र आणि 1 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अष्टपैलू कामगिरीची पावती
तानाजी क्षीरसागर यांनी आपल्या नियमित कामापलीकडे जाऊन आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची व्याप्ती मोठी असून यात प्रामुख्याने आरोग्य मोहिमांमध्ये पल्स पोलिओ,कोरोना काळ, कुटुंब कल्याण, क्षयरोग, कुष्ठरोग, अंधत्व आणि हत्तीरोग निर्मूलन मोहिमांत उल्लेखनीय कामगिरी.
मजुरांसाठी सेवा: प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत खडी फोड, वीटभट्टी व इतर मजुरांसाठी विशेष आरोग्य शिबिरे राबवली.
CSR मधून विकास: ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी त्यांनी मुंबईतून CSR फंड मिळवून बारूळ (ता. तुळजापूर) उपकेंद्रासाठी 4.65 लाख आणि बेंबळी (ता. धाराशिव) प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 6.21 लाख रुपयांचे साहित्य उपलब्ध करून दिले.
सामाजिक बांधिलकी: 'आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव' योजनेचे समिती सदस्य म्हणून काम पाहिले. तसेच, स्वतःच्या कन्येच्या लग्नात वृक्ष संवर्धनाचा संदेश देत सामाजिक भान जपले.

साहित्य आणि प्रशिक्षणातही आघाडीवर
केवळ आरोग्य सेवाच नव्हे, तर साहित्याची ओढ असलेल्या क्षीरसागर यांनी शेतकरी जीवनावर आधारित 'पोळा' ही कथा देखील लिहिली आहे. त्यांच्या यापूर्वीच्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन शासनाने त्यांना 2006 मध्ये आगाऊ वेतनवाढ देऊन गौरवले होते, तर सलग दोन वर्षे (2023 ते 2025) त्यांना जिल्हास्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण आरोग्य विभागातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments