Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शिवाजी महाराजांची जयंती माधवराव पाटील महाविद्यालयात उत्साहात साजरी

मुरुम/प्रतिनिधी 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त श्री माधवराव पाटील महाविद्यालय येथे गुरुवारी (ता. 19) उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. महेश मोटे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दूरदृष्टी ठेवून अनेक गड-किल्ले स्वराज्यात सामील केले. त्यांनी स्वकीय व परकीय शक्तींशी संघर्ष करत रयतेचा हितकारक राज्यकारभार उभारला. कुशल प्रशासन, सर्वधर्मसमभाव आणि स्त्रियांचा सन्मान या तत्त्वांवर आधारलेले सुराज्य त्यांनी निर्माण केले, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. राजकुमार रोहीकर, डॉ. संध्या डांगे, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. सायबण्णा घोडके, डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ. दिनकर बिराजदार, डॉ. नरसिंग कदम, डॉ. रवींद्र आळंगे, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. अरुण बावा, डॉ. महादेव कलशेट्टी, डॉ. रमेश आडे, प्रा. सोमनाथ व्यवहारे, प्रा. अशोक बावगे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजू ढगे, सुरेखा पाटील, दत्तू गडवे, नितीन कंटेकुरे, लालअहमद जेवळे, चंद्रकांत पुजारी, दिलीप घाटे, इसाली चाऊस व व्यंकट मंडले यांनी पुढाकार घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. किरण राजपूत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केले. यावेळी विविध शाखांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुरुम (ता. उमरगा) येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त डॉ. चंद्रकांत बिराजदार यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी वृंद.

Post a Comment

0 Comments