मुरुम/प्रतिनिधी
उमरगा (दि. १९) येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे शिवजयंतीनिमित्त विविध पारंपरिक खेळ व शिवकालीन वेषभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे व सहसचिव डॉ. सुभाष वाघमोडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिषेक पूजा करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी वेषभूषा स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेमध्ये शिवकालीन परंपरा आणि इतिहास जिवंत करत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, मावळे सैनिक, तानाजी मालुसरे, समर्थ रामदास तसेच इतर शिवकालीन व्यक्तींच्या वेशभूषेचे प्रभावी सादरीकरण केले.तसेच लाठी-काठी व दांडपट्टा सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले.
आयन शेख याच्या दांडपट्टा व लाठी-काठी सादरीकरणाचे विशेष कौतुक करण्यात आले.
वेषभूषा स्पर्धेत महाराजांच्या गटात प्रथम क्रमांक सुशिल सूर्यवंशी यांनी पटकावला, तर द्वितीय क्रमांक आरती सोनकांबळे, हर्षदा ममाले, अश्विनी पाटील, वैष्णवी काळे, आयन शेख आणि हर्षदा सूर्यवंशी यांनी मिळविला. दांडपट्टा प्रकारात विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. दुसऱ्या गटात प्रतीक्षा दुरगुडे व स्नेहा चौहान यांना गौरविण्यात आले. तसेच ‘छोट्या जिजाऊ’ वेषभूषेत कु. तृप्ती नितीन कोराळे व स्वाधिका बिराजदार यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सर्व विजेत्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्रांचे वितरण संस्थेचे सहसचिव डॉ. सुभाष वाघमोडे व प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. पी. ए. पिटले व पर्यवेक्षक शैलेश महामुनी उपस्थित होते.
या उपक्रमास निमंत्रित मान्यवर, महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments