Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कुन्हाळी येथे 'आदर्श'चे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात सुरू​'विकसित भारत' आणि 'शाश्वत विकासा'साठी युवकांचे योगदान आवश्यक : मान्यवरांचे मत

​मुरुम/प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि आदर्श महाविद्यालय, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'राष्ट्रीय सेवा योजना' (NSS) विशेष शिबिराचा प्रारंभ कुन्हाळी येथे मोठ्या उत्साहात झाला. "पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन व पडीक जमिनीच्या शाश्वत विकासात युवक-युवतींची भूमिका" या मुख्य संकल्पनेवर हे सात दिवसीय शिबिर आधारित आहे.
​दिमाखदार उद्घाटन सोहळा
​या शिबिराचे उद्घाटन श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मल्लीनाथ दंडगे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रामकृष्णपंत खरोसेकर होते.
यावेळी कमलादेवी लव्हरे (सरपंच),​सुधीर पाटील (उपसरपंच),​डॉ. राम सोलंकर (प्राचार्य)बलभीम चव्हाण (मुख्याध्यापक),संजय पाटील (पोलीस पाटील) यांची प्रमुख उपस्थिती होती.

​विद्यार्थी हा समाजव्यवस्थेचा पाया - रामकृष्णपंत खरोसेकर
​अध्यक्षीय भाषणात खरोसेकर म्हणाले की, "राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून उत्कृष्ट समाज घडवण्याचे पवित्र कार्य केले जाते. महाविद्यालयीन तरुणांना या शिबिरामुळे समाजसेवेची प्रत्यक्ष संधी मिळते. विद्यार्थ्यांनी सुसंस्कारित होऊन देशाच्या प्रगतीत भर टाकावी."
​समाजसेवा म्हणजे 'सामाजिक अध्यात्म' - प्राचार्य डॉ. राम सोलंकर
​प्राचार्य डॉ. सोलंकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांनी समाजसेवेचे कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज आहे. आजचे विद्यार्थी हेच उद्याच्या विकसित भारताचे निर्माते आहेत. एनएसएस हे एक प्रकारे सामाजिक अध्यात्मच आहे."
​शिबिराची वैशिष्ट्ये:
​या सात दिवसांच्या कालावधीत खालील विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रत्यक्ष कार्य होणार आहे:
​सेंद्रिय शेती व पर्यावरण संवर्धन,ग्रामस्वच्छता व शाळा परिसर स्वच्छता,विकसित भारत व भारतीय संविधान जनजागृती हे या शिबिराचे वैशिष्ट्य आहेत.
​सूत्रसंचालन व आभार:
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. लक्ष्मण बिराजदार यांनी केले, तर आभार कार्यक्रमाधिकारी प्रा. तात्याराव चव्हाण यांनी मानले. याप्रसंगी मोठ्या संख्येने प्राध्यापक, शिबिरार्थी विद्यार्थी आणि कुन्हाळी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments