Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आई-वडील हेच पहिले गुरु; त्यांच्या कष्टांचे मोल राखणे हीच खरी शिवजयंती!मुरूममध्ये व्याख्याते वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाला जनसागराचा प्रतिसाद


मुरूम :(प्रतिनिधी)
"मोबाईल आणि आधुनिक जीवनशैलीच्या प्रभावामुळे आजच्या तरुण पिढीत संवाद कमी होत चालला आहे. हे टाळण्यासाठी पालकांनी मुलांना वेळ देणे आणि आदर्श वर्तन ठेवणे गरजेचे आहे. आई-वडील हेच मुलांचे पहिले गुरु असतात, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांचा सन्मान राखणे,हीच छत्रपती शिवाजी महाराजांना खरी मानवंदना आणि खरी शिवजयंती ठरेल," असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले.

'आई-वडील आणि संस्कारांचे पावित्र्य' विषयावर प्रबोधन
मुरूम येथील अशोक चौकात किसान शिवजन्मोत्सव समिती, किसान चौक यांच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. शनिवारी (दि. 22) रात्री पार पडलेल्या या कार्यक्रमाला महिला,युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. हंकारे यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून शिवरायांच्या जीवनातील मातृसंस्कारांचे महत्त्व पटवून दिले. "राजमाता जिजाऊंनी दिलेल्या संस्कारांमुळेच शिवराय घडले. आई-वडिलांचे आशीर्वाद हीच यशाची गुरुकिल्ली आहे," असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील आणि व्याख्याते वसंत हंकारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी होती यामध्ये प्रामुख्याने रमेश चव्हाण (उपनगराध्यक्ष),नगरसेवक राजेंद्र बेंडकाळे,गौस शेख, सुजित शेळके, राजू मुल्ला,राहुल वाघ आदी मान्यवरांसह रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष प्रा.डॉ.आप्पासाहेब सूर्यवंशी, सचिव कलाप्पा पाटील,संतोष कांबळे,सुनील राठोड, डॉ. खाजालाल ढोबळे, नागनाथ बदोले, विजयकुमार देशमाने,संजय सावंत उपस्थित होते.

कुटुंबव्यवस्थेचे जतन करण्याचा संकल्प
व्याख्यानादरम्यान हंकारे यांनी आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत कुटुंबव्यवस्था टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रभावी मांडणीला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी शिवरायांच्या विचारांचा अंगीकार करून कौटुंबिक नात्यांचे पावित्र्य जपण्याचा संकल्प केला.

समितीचे नेटके नियोजन
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किसान शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रामहरी अंबर, उपाध्यक्ष स्वप्निल जाधव, सचिव विशाल जाधव, सहसचिव पवन फुकटे व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले, सूत्रसंचालन मोहन जाधव यांनी तर आभार अजिंक्य मुरूमकर यांनी मानले. अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात हा सोहळा पार पडला.

मुरूम येथील अशोक चौकात किसान शिवजन्मोत्सव समिती आयोजित व्याख्यानाप्रसंगी मार्गदर्शन करताना वसंत हंकारे. सोबत शरण पाटील व अन्य मान्यवर.

आमच्या ताज्या अपडेटसाठी पहात रहा Only न्युज धाराशिव

Post a Comment

0 Comments