Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापुरात जयराज घाडगे यांचा 22 वा वाढदिवस उत्साहात साजरा; मान्यवरांच्या उपस्थितीत अभीष्टचिंतन

तुळजापूर: Only न्युज धाराशिव
तुळजापूर येथील नळदुर्ग रोडवरील सुप्रसिद्ध 'राज सिरॅमिक अँड बिल्डिंग मटेरियल'चे सर्वेसर्वा प्रा. राजेंद्र घाडगे यांचे चिरंजीव जयराज घाडगे यांचा 22 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि कौटुंबिक स्नेहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून जयराज यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नातेवाईकांकडून शुभेच्छांचा वर्षाव आणि उपस्थितांकडून सत्कार
वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. राजेंद्र घाडगे, नवोदय विद्यालयाचे प्रा. जाधव सर, ज्येष्ठ पत्रकार उमाजी गायकवाड आणि घाडगे परिवारातील सदस्यांच्या हस्ते जयराज यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.


असा झाला सोहळा
औक्षण व केक कटिंग: कार्यक्रमाची सुरुवात सौ. सुचिता राजेंद्र घाडगे, सौ.जाधव मॅडम ,सौ.दिव्या कोरेकर,सौ. वैशाली लबडे, महिलांनी जयराज यांचे औक्षण करून केली. त्यानंतर फटाक्यांच्या भव्य आतषबाजीत केक कापून आनंद साजरा करण्यात आला.

उपस्थिती: यावेळी प्रा. राजेंद्र घाडगे, तात्या लबडे, प्रा. जाधव सर (नवोदय विद्यालय), पत्रकार उमाजी गायकवाड, अक्षय कोरेकर, कुंदन लबडे, कृष्णात सरवदे परिवार, तात्या लबडे परिवार व परमेश्वर पवार परिवारातील सदस्य आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

स्नेहभोजन: वाढदिवसाच्या निमित्ताने घाडगे परिवाराच्या वतीने सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रा. राजेंद्र घाडगे यांचा एकुलता एक मुलगा असलेल्या जयराज यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर नातेवाईक, मित्र परिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता.

जयराज माझ्या स्वप्नांचा वारसदार 
        --प्रा.राजेंद्र घाडगे 
"जयराजचा 22 वर्षांचा हा प्रवास पाहताना आज माझी पत्नी सौ. सुचिता व वडील म्हणून माझ्या खुप अपेक्षा आहेत. जयराज हा केवळ माझा मुलगा नाही, तर माझ्या कष्टाचा आणि स्वप्नांचा वारसदार आहे. तो आरोग्याच्या त्रासातून मुक्त व्हावा आणि त्याने त्याच्या आयुष्यात यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करावीत आणि एक सुसंस्कृत नागरिक म्हणून समाजात वावरावे भविष्यात तो नक्कीच सुधारेल  अशी मला खात्री आहे हीच आजच्या दिवशी सदिच्छा आहे."
— प्रा. राजेंद्र घाडगे (संचालक, राज सिरॅमिक)

आमच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा – 'Only न्युज धाराशिव'

Post a Comment

0 Comments