मंगरुळ/ चॉंदसाहेब शेख:
जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस वर्ल्ड कप - 5 (2026) स्पर्धेत मंगरुळ येथील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन करत गावासह राज्याचा मान उंचावला आहे. विशेष म्हणजे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची नोंद प्रतिष्ठित विन्झा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील बालाघाटाच्या कुशीत वाढलेल्या या विद्यार्थ्यांनी लाखो स्पर्धकांमधून उल्लेखनीय कामगिरी करत “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन” हा बहुमान पटकावला. त्यांच्या या यशामुळे मंगरुळच्या शैक्षणिक पॅटर्नची देशभरात ख्याती पसरली असून सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
🌟 मानाचे विजेते विद्यार्थी
लाखो स्पर्धकांमधून खालील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत मानाचे क्रमांक पटकावले —प्रसाद शिवाजी लबडे — चॅम्पियन ऑफ चॅम्पियन (रॅंक-2)
आदर्श अच्युत कापसे — चॅम्पियन ऑफ चॅम्पियन
प्रवीण बापू डोंगरे — चॅम्पियन ऑफ चॅम्पियन
यश विरेश डोंगरे — चॅम्पियन ऑफ चॅम्पियन
आर्यन अमोल शिंदे — चॅम्पियन ऑफ चॅम्पियन
असद शब्बीर बागवान — चॅम्पियन ऑफ चॅम्पियन
जुबेर चांदसाहेब शेख — चॅम्पियन ऑफ चॅम्पियन
संस्कृती किशोर वाळके — चॅम्पियन ऑफ चॅम्पियन
सिद्धी गेणदेव हजारे — चॅम्पियन ऑफ चॅम्पियन
श्रवण ज्ञानेश्वर सरडे — चॅम्पियन ऑफ चॅम्पियन
या विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्ता, वेग, अचूकता, एकाग्रता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
🗣️ काय म्हणाले आयोजक?
या स्पर्धेत देशातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वेगवान गणित, अचूकता आणि वेळेचे व्यवस्थापन या निकषांवर परीक्षा घेण्यात आली. सातत्यपूर्ण सराव, अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या बळावर मंगरुळच्या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.
या सर्व यशाचे श्रेय Proactive Abacus मंगरुळ चे संचालक आशिष साठे यांना विद्यार्थ्यांनी व पालकांनी दिले आहे. आशिष साठे यांनी मंगरुळच्या शैक्षणिक पद्धतीचा डंका देशभर वाजवला असून त्यांच्या मेहनतीचे, सातत्याचे आणि सचोटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मंगरुळसारख्या ग्रामीण भागातून घडलेली ही कामगिरी राज्यासह देशासाठी प्रेरणादायी ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावाचा अभिमान द्विगुणित झाला आहे.
Only न्यूज धाराशिव कडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🎉
0 Comments