Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

Only न्युज धाराशिव' विशेष: ढोकीत शिवजन्मोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह! शिवभक्तांचा महासागर; सेवा आणि भक्तीच्या त्रिवेणी संगमाने मिरवणूक ठरली ऐतिहासिक. 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोष, डॉल्बीचा कडकडाट अन् बालवारकऱ्यांचा टाळ-मृदंगाचा गजरानेआसमंत दुमदुमला

ढोकी/सुरेश कदम 
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. गुरुवार दि.20 सायंकाळी निघालेल्या भव्य मिरवणुकीत डॉल्बीचा खणखणाट आणि बालवारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाचा गजर अशा भक्ती आणि शक्तीच्या संगमाने ढोकी नगरी शिवमय झाली होती.

मिरवणुकीचे मुख्य आकर्षण
सायंकाळी 5:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये महाराजांची भव्य मूर्ती आणि शेजारीच ठेवलेली पालखी शिवभक्तांचे लक्ष वेधून घेत होती. फटाक्यांच्या आतषबाजीत 'जय जिजाऊ, जय शिवराय' आणि 'एकच राजा शिवाजी राजा' अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

बालवारकऱ्यांचा भक्तीरस: पांढरा पोशाख आणि कपाळाला केशरी गंध लावलेले बालवारकरी हातात टाळ-मृदंग घेऊन 'ज्ञानोबा-तुकाराम' नामाच्या जपात दंग झाले होते.

युवाशक्तीचा जल्लोष: डॉल्बीच्या तालावर तरुणाईने भगवे झेंडे फडकवत शिवरायांच्या जयघोषात ठेका धरला.

असा होता मिरवणूक मार्ग
ही मिरवणूक लातूर-बार्शी राज्यमार्गावरून छत्रपती संभाजी महाराज चौक, सोसायटी गोडाऊन, धनगर गल्ली, वस्ताद वाडा, नगरेश्वर नगर, लंगडे गल्ली, गणेश मंदिर, मारवाड गल्ली मार्गे हनुमान चौक येथे पोहोचली. या ठिकाणी महाराजांची महाआरती करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

सेवाभावी उपक्रमांची परंपरा कायम
मिरवणूक मार्गावर शिवभक्तांसाठी विविध संस्थांकडून अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.


महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ: शिवभक्तांना पोहे वाटप,

कै. किसनतात्या समुद्रे युवा प्रतिष्ठान: उपसरपंच अमोल समुद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवभक्तांना दर्जेदार अल्पोपहार देण्यात आला.

निहाल काझी मित्र मंडळ: बाजार समितीचे माजी सभापती निहाल काझी यांच्या संकल्पनेतून मिरवणुकीत मोफत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. निहाल काझी यांनी सामाजिक सलोखा जपत ही परंपरा कायम राखल्याबद्दल शिवजन्मोत्सव समितीने त्यांचे विशेष आभार मानले.

नगरेश्वर नगर: या भागातही नागरिकांकडून पिण्याचे पाणी आणि 'रसना'चे वाटप करण्यात आले.

या भव्य सोहळ्यात शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी आणि ढोकी पंचक्रोशीतील हजारो शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आमच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा--'Only न्युज धाराशिव

Post a Comment

0 Comments