Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिवच्या मातीतील सुगंधाचा पुण्यात सन्मान; बापू काळे यांच्या 'बाभळीची फुले' काव्यसंग्रहास 'उल्लेखनीय साहित्यकृती' पुरस्कार

  --उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार           स्वीकारताना कवी बापू काळे

काटी/उमाजी गायकवाड 
पुणे महानगरपालिका, मराठी भाषा संवर्धन समिती, संवाद पुणे आणि यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा प्रतिष्ठित 'उल्लेखनीय साहित्यकृती पुरस्कार' यंदा तुळजापूर तालुक्यातील काटीचे सुपुत्र तथा सावरगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले सहशिक्षक कवी बापू काळे यांच्या 'बाभळीची फुले' या पहिल्याच काव्यसंग्रहास जाहीर झाला आहे.

पुण्यातील ऐतिहासिक बालगंधर्व रंगमंदिरात पार पडलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (IPS) तथा संमेलनाध्यक्षांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन बापू काळे यांचा गौरव करण्यात आला.

साहित्यातील 'बाभळी'चा दरवळ नोव्हेंबर 2025 मध्ये प्रकाशित झालेला 'बाभळीची फुले' हा काव्यसंग्रह ग्रामीण जीवन, निसर्ग आणि मानवी संवेदनांचे यथार्थ चित्रण करणारा ठरला आहे. या पुरस्कारामुळे धाराशिव जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, शिक्षण, कला, सामाजिक आणि राजकीय अशा सर्वच स्तरातून बापू काळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सदर काव्यसंग्रह वाचकांसाठी उपलब्ध असून, इच्छुकांनी 9763138062  या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कवी बापू काळे यांनी केले आहे.

.                       --कवी सहशिक्षक बापू काळे 

"पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत राज्यस्तरीय सन्मान मिळणे, हे माझ्यासारख्या ग्रामीण भागातील लेखकाला ऊर्जा देणारा पुरस्कार आहे"
"बाभळीची फुले म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नाही, तर ग्रामीण जीवनातील संघर्षाचा आणि जगण्याच्या आनंदाचा एक प्रामाणिक अविष्कार आहे. हा पुरस्कार माझ्या कष्टकऱ्यांच्या शब्दांचा सन्मान तर आहेच परंतु माझ्या पहिल्याच काव्यसंग्रहाला पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत राज्यस्तरीय सन्मान मिळणे, हे एका ग्रामीण भागातील लेखकासाठी ऊर्जा देणारा आहे. हा पुरस्कार माझ्या पुढच्या साहित्यिक प्रवासाची जबाबदारी वाढवणारा असून  "काट्याकुट्यांत उमललेल्या बाभळीच्या फुलांचा सुगंध आज साहित्याच्या दरबारात पोहोचला, याचा मनस्वी आनंद आहे.".                                                   — सहशिक्षक बापू काळे
                                काटी ता.तुळजापूर 

आमच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा – 'Only न्युज धाराशिव'

Post a Comment

0 Comments