तुळजापूर: भारतीय जनता पार्टीचे खंबीर नेतृत्व, माजी प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा वाढदिवस आज तुळजापुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने कार्यकर्त्यांनी एकत्र येत श्री तुळजाभवानी देवीच्या महाद्वारासमोर सामुदायिक आरती केली आणि लाडक्या नेत्याला दीर्घायुष्य लाभो, असे साकडे आई भवानीच्या चरणी घातले.
सामुदायिक आरती आणि शुभेच्छांचा वर्षाव
सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप कार्यकर्त्यांनी तुळजापूरच्या मुख्य महाद्वारासमोर भक्तिमय वातावरणात आरतीचे आयोजन केले होते. 'सुजितसिंह ठाकूर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याप्रसंगी प्रदेश भाजप सदस्य गुलचंद व्यवहारे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले, जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक, इंद्रजीत साळुंखे, प्रसाद पानपुडे, शांताराम पेंदे, अजीत अमृतराव, अण्णा क्षीरसागर, सागर पारडे, राजाभाऊ मलबा, आप्पा पवार, विलास पारडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"आमचे मार्गदर्शक सुजितसिंह ठाकूर हे केवळ नेते नसून सामान्य कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ आहेत. त्यांनी नेहमीच संघटनात्मक बांधणीला महत्त्व दिले आहे.ज्या पद्धतीने सुजितसिंह ठाकूर साहेब यांनी कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे, ती कौतुकास्पद आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज तुळजापुरात जो उत्साह पाहायला मिळाला, तो त्यांच्यावरील प्रेमाची पावती आहे. आगामी काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची पाळेमुळे अधिक घट्ट होतील, असा विश्वास वाटतो."आज आई तुळजाभवानीच्या चरणी आम्ही हीच प्रार्थना केली की, त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाची घोडदौड अशीच सुरू राहो."
-गुलचंद व्यवहारे
(प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजप)
0 Comments