Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पुण्यातील आंतरराष्ट्रीय 'बिझनेस एक्स्पो'मध्ये धाराशिवचा डंका! उद्योजक अमरसिंह देशमुख यांच्या 'सन ग्रुप'चा भव्य स्टॉल

धाराशिव/उमाजी गायकवाड 
मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशन (MEA) तर्फे पुणे येथील सिंचन नगरच्या ॲग्रीकल्चर ग्राऊंडवर दि. 27 फेब्रुवारी,28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 या कालावधीत 'MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक प्रदर्शनात धाराशिवचे नाव उज्ज्वल करण्यासाठी 'सन ग्रुप'चे सर्वेसर्वा आणि प्रसिद्ध तुळजापूर तालुक्यातील काटीचे सुपुत्र उद्योजक अमरसिंह देशमुख आपल्या नाविन्यपूर्ण उत्पादनांसह सहभागी होत आहेत.

धाराशिवच्या उद्योजकतेचे पुण्यात दर्शन
धाराशिव येथील एम.आय.डी.सी. मधील प्रसिद्ध संस्था 'सनविन युपीव्हीसी सोल्युशन' (सन ग्रुप) यांचा स्टॉल या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. स्टॉल क्रमांक C-65 वर प्रामुख्याने अत्याधुनिक युपीव्हीसी (UPVC) ग्लायडिंग विन्डो,पार्टिशन डोअर,खिडक्या-दरवाजे आणि सुबक दगडी 'तुळशी वृंदावन' प्रदर्शित करण्यात येणार आहेत. धाराशिवमध्ये निर्माण झालेली ही दर्जेदार उत्पादने आता पुणेकरांच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजकांच्या पसंतीस उतरण्यासाठी सज्ज आहेत.

काय आहे कार्यक्रमाचे स्वरूप?
या तीन दिवसीय एक्स्पोचे उद्घाटन शुक्रवारी, 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखरजी बावनकुळे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मा. ना. मुरलीधरजी मोहोळ आणि मा. श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या प्रदर्शनात 500 हून अधिक स्टॉल्स असून, बिझनेस एक्स्चेंज फोरम, इंडस्ट्री समिट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.

.           --उद्योजक अमरसिंह देशमुख, धाराशिव 

अमरसिंह देशमुख यांचे आवाहन
या ऐतिहासिक एक्स्पोमध्ये उद्योग विश्वातील नव्या संधी, आधुनिक कल्पना आणि उत्कृष्ट उत्पादनांचा अनुभव घेण्यासाठी धाराशिवकर तसेच पुण्यातील सर्व धाराशिवकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. विशेषतः आपल्या मातीतील उद्योजकाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टॉल क्रमांक C-65 ला नक्की भेट द्यावी, असे आवाहन 'सन ग्रुप'चे सर्वेसर्वा अमरसिंह देशमुख यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय 'बिझनेस एक्स्पो विषयी थोडक्यात माहिती:
प्रदर्शनाचे नाव: MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026
दिनांक: 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026
वेळ: सकाळी 10 ते रात्री 9 (प्रवेश सर्वांसाठी खुला)
ठिकाण: ॲग्रीकल्चर ग्राऊंड, सिंचन नगर, पुणे.
सन ग्रुप स्टॉल: स्टॉल नं. C-65

अमरसिंह देशमुख आणि सन ग्रुपला या भव्य 'बिझनेस एक्स्पो 2026' साठी थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची बातमी असलेल्या "✍️ Only न्युज धाराशिव" कडून खूप खूप शुभेच्छा! धाराशिवच्या उद्योजकतेचा ठसा पुण्यात नक्कीच उमटेल, याची खात्री आहे.

Post a Comment

0 Comments